महाराष्ट्र वेदभुमी

चिल्हे रोहा येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.


कोलाड (श्याम लोखंडे): रोहा तालुक्यातील आध्यात्मिक परंपरेचा वारसा लाभलेल्या तसेच सद्गुरू गुरुवर्य अलिबागकर महाराज, गुरुवर्य गोपाल महाराज वाजे, गुरुवर्य धोंडू महाराज कोल्हटकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खांब पंचक्रोशीचा गुरुपौर्णिमेचा पारंपरिक आणि भक्तिभावपूर्ण उत्सव सहलाबादप्रमाणे ज्या गावी अखंड हरिनाम सप्ताह त्या गावी गुरू पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो या अनुषंगाने यावर्षी हा गुरुपौर्णिमा उत्सव मौजे चिल्हे येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला...

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कलश पूजन तसेच स्वा.सु.नि.गुरुवर्य अलिबागकर महाराज, गुरुवर्य गोपाल महाराज वाजे, गुरुवर्य धोंडू महाराज कोल्हटकर यांचे अधिष्ठानप्रति मनोभावे पाद्यपूजन तर शुभमुहूर्तावर येथील मंदिर परिसर अत्यंत आकर्षक फुलांची सजावट व रोषणाई करण्यात आली होती... खांब पंचक्रोशीत आदिस्थान रायगड भूषण डॉ हभप मारुती महाराज कोल्हटकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले...

कार्यक्रमाची सुरुवात कलश पूजन व श्रींच्या आदिस्थान पूजनाने करण्यात आली... संप्रदाय परंपरेनुसार अभंग पठण, हरिपाठ, तद्नंतर सायंकाळी सात ते नऊ या वेळेत खांब पंचक्रोशीचे वैभव रायगड भूषण हभप डॉ मारुती महाराज कोल्हटकर यांची कीर्तन सेवा संपन्न झाली...यावेळी पंचक्रोशीत अध्यक्ष हभप कृष्णा महाराज जाधव, उपाध्यक्ष प्रकाश थिटे,सेक्रेटरी सहदेव महाडिक , कीर्तनकार हभप भूषण महाराज वरखले,गवई विनोद कोस्तेकर, नितीन कचरे, निलेश कचरे, साहिल, मृदंगमनी प्रेम, सरपंच रविंद्र मरवडे, सह पंच पदाधिकारी तसेच पंचक्रोशीतील खांब, वैजनाथ, शिरवली, मुठवली, नडवली, धानकान्हे ,देवकान्हे, बाहे, येथील वारकरी संप्रदाय मंडळी तथा भक्तगण तसेच आदी चिल्हे ग्रामस्थ महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते... प्रसंगी गुरुपोर्णिमा निमित्ताने कीर्तनाचा तसेच दर्शनाचा लाभ घेतला...

श्रींची आरती व प्रसाद,भजन, प्रवचन, महाआरती, महाप्रसाद, गुरूमंत्र प्रदान सोहळा आणि सायंकाळी सुमधुर आवाजात कोल्हटकर महाराज यांचे प्रेरणादायी किर्तन हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले... या भक्तिपूर्ण आणि अध्यात्मिक वातावरणात पार पडलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन चिल्हे ग्रामस्थ आणि श्री संत सेवा मंडळ खांब पंचक्रोशी यांच्या सहकार्याने करण्यात आली होती तर शेवटी महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता कऱण्यात आली तर हा कार्यक्रमच यशस्वी करण्यासाठी चिल्हे ग्रामस्थ,महीला, व युवक युवतींनी अथक परिश्रम घेतले...

Post a Comment

Previous Post Next Post