महाराष्ट्र वेदभुमी

कन्हान पिपरी नगरपरिषदने योजनांची जाहिरात नव्हे तर लाभार्थ्यांसाठी अमलंबजवानी करावी- प्रशांत बाजीराव मसार

कन्हान - कन्हान नगरपरिषद अंतर्गत गरजू अपंग, विकलांग , दुर्धर आजाराने पीडित व बेघर कुटुंबांना घरकुल व पट्टे योजनांचा लाभ तत्काळ देण्यात यावा आणि निवडणुकीपूर्वी केवळ जाहिरातबाजी न करता अंमलबजावणी करण्यात यावी..अशी मागणी कन्हान पिपरी नगरपरीषद मुख्यधिकारी मार्फत जिल्हाधिकारी. श्री. विपीनजी इटनकर नागपुर याना सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार यानी केली आहे...

कन्हान-पिपरी नगरपरिषद हद्दीत गेल्या काही आठवड्यांपासून विविध शासकीय योजनांची जाहिरात, प्रचारबाजी, पत्रके, बॅनर्स व सोशल मीडियावर प्रसार सुरू आहे... हे सर्व कार्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केवळ जनतेला आकर्षित करण्याच्या हेतूने करण्यात येत आहे..

वास्तव मागील दहा वर्षांपासून नगरपरिषद क्षेत्रातील मुलभूत नागरी प्रश्न- 

शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, बाजार रस्त्यांचे नियोजन नाही, बसस्टॉप नाही, स्मशानभूमी-मोक्षधाम उपलब्ध नाही, विकलांग- अपंग व दुर्धर आजाराने ग्रस्त कुटुंबीयांना पट्टे वितरण नाही, घरकुल-आवास योजना प्रभावीपणे लागु नाही, बेघर कुटुंबांना निवारा नाही, लहान व्यापाऱ्यांचे पुनर्वसन केले नाही, हे कोणतेही प्रश्न आजपर्यंत प्राधान्याने सोडविण्यात आलेले नाहीत...

तसेच, WCL (वेकोली) च्या मनमानी कारभारावर कोणताही अंकुश लावण्यात आलेला नाही... अनेकदा अपात्र व झेरॉक्स कागदपत्रांची मागणी करून गरजूंना भ्रमित करण्याचे प्रकार सातत्याने चालू आहेत...

म्हणूनच, निवडणुकीचा कालखंड न येता, आजही जे खरोखर गरजू आहेत – अपंग, विकलांग, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या, बेघर अशा कुटुंबना – यांना तत्काळ घरकुल आवास योजना व पट्टे योजनेचा लाभ प्रत्यक्षात देण्यात यावा. अन्यथा, मागील दहा वर्षापासून हे सर्व केवळ निवडणुकीपूर्वीचा "देखावा" व "दिशाभूल" ठरतोय...

ह्या अनुषंगाने, आपणास विनंती आहे की, प्रशासनाने तातडीने या योजनांची पारदर्शक व गरजू व्यक्तींना न्याय देणारी अंमलबजावणी करावी...

सत्तेचे राजकारण बाजूला ठेवून, सामान्य जनतेच्या जीवनमानाचा खरा कायापालट प्रशासनाच्या कृतीतून दिसून यावा, हीच आमची अपेक्षा मागणी आहे...

या सर्व चालेल्या शासकीय योजना गतिविधि वर प्रशासनचे डोळे उघडण्या करिता प्रशांत बाजीराव मसार यांनी ही लेखी तक्रार नगरपरीषद मुख्याधिकारी घोडके मार्फत नागपुर जिल्हाधिकारी श्री.विपिन इटनकर यांना केली असून व स्थानिक प्रत्यक्ष भेटुन श्री.श्यामकुमार बर्वे खासदार रामटेक लोकसभा यांना याबाबत महिती देण्यांत आली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post