महाराष्ट्र वेदभुमी

रोहा शेतकऱ्यांचे इको सेन्सेटिव्ह झोन हरकतीबाबत आ महेंद्र दळवी यांना निवेदन,

संसदेत अधिवेशनातून खा. सुनील तटकरेंनी शेतकऱ्यांची हरकत नोंदवावी आ. दळवींचे प्रतिपादन.

कोलाड (श्याम लोखंडे): रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यात इको सेन्सेटिव्ह झोन टाकण्यात आल्याचा मसुदा तहसील कार्यालयाकडून रोहा तालुक्यातील तलाठी सजाद्वारे जारी करण्यात येत असून त्यावर येत्या साठ दिवसांत आपली हरकत नोंदविण्यास अधिसूचना जारी करण्यात आलेल्या मसुद्यात म्हटले आहे... तर केंद्र सरकारने जारी केलेल्या वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र त्यामुळे संपूर्ण रोहा तालुक्यातील ११९ गावांचा समावेश येत असल्याचे अधिसूचना जारी करण्यात आलेल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे... तर याबाबत बहुतांश शेतकरी ग्रामस्थांची धावा धाव सुरू झाली असून यावर हरकत तसेच ते रद्द करण्यात यावा म्हणून सदरील तहसीलदार, प्रांताधिकारी,जिल्हाउपवनधिकारी, जिल्हा अधिकारी रायगड, तसेच आमदार खासदार यांना निवेदन देत असून अलिबाग, रोहा, मुरूडचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांना देखील निवेदन देण्यात आले यावेळी त्यांनी उपस्थिती निवेदनकर्ते शेतकरी ग्रामस्थ यांना निवेदनावर मार्गदर्शन करतांना सांगितले की हा विषय केंद्रवसारकाच्या अधिपत्यास असल्याने संसदेत अधिवेशनातून खासदार सुनील तटकरेंनी यांनी केंद्र सरकारने जारी केलेल्या वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित परिपत्रकाला शेतकऱ्यांची हरकत असल्याचा प्रश्न उपस्थित करून ते रद्द करण्यासाठी प्रयत्न करावे असा टोला लगावत यावरील अधिक माहिती घेत अधिक सूचना आ.महेंद्रशेठ दळवी यांनी उपस्थितांना दिल्या...

जिल्ह्यातील तब्बल 437 गावे ही इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याचे केंद्रशासनाच्या मसुदामध्ये आहे.तर त्यात रोहा तालुक्यातील 119 गावांना वन व पर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे संवेदनशील गावे म्हणून घोषित करत  असुन यात आम्ही सदरील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे, तळवली, या गावांचा समावेश आहे या अनुषंगाने यावर हरकती घेत शेतकरी ग्रामस्थांवर लादले जात असलेले वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र हे रद्द करण्यात यावा यासाठी रोहा तालुक्यातील वरील ग्रामस्थानी सोमवारी याबाबत आमदार महेंद्रशेठ दळवी यांची या शेतकरी ग्रामस्थ नागरिकांनी त्यांच्या अलिबाग येथील निवासस्थानी भेट घेत निवेदन दिले यावेळी त्यांनी सांगितले...या प्रसंगी यावेळी रोहा तालुक्यातील तसेच खांब देवकान्हे विभागातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post