१९व्या वर्षीही सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम
अलिबाग : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व नामवंत विधिज्ञ अँड. प्रवीण मधुकर ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत सैनिक कल्याण निधीस १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली... त्यांनी जिल्हा सैनिक कार्यालयात सब लेफ्टनंट (निवृत्त) विजय पाटील यांच्याकडे धनादेश सुपूर्त केला...
गेल्या १९ वर्षांपासून ते नियमितपणे हा उपक्रम राबवत आहेत... “देशासाठी झुंजणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबांसाठी हातभार लावणे ही प्रत्येकाची जबाबदारी,” असे अँड. ठाकूर म्हणाले...
सैनिक अधिकारी विजय पाटील यांनी आभार मानत सांगितले, “अशा मदतीमुळे शहीद व सेवापर सैनिकांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळतो... समाजातील इतरांनीही प्रेरणा घ्यावी.”
याप्रसंगी अपूर्वा ठाकूर, धनश्री ठाकूर, कुबेर ठाकूर, आर.डी. पाटील, सुभेदार अभिजित शिंदे, नायक बळीराम म्हात्रे, तबिश खान, संजय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते... या सामाजिक कार्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे...
