महाराष्ट्र वेदभुमी

कोंडवाडे बंद ! मोकाट जनावरांचे रस्त्यावर ठाण ; अपघाताची भीती

नागरिकांची मालकावर दंडात्मक कार्यवाहीची मागणी

प्रतिनिधी : सचिन चौरसिया

रामटेक :- मोकाट जनावरांच्या त्रासाने नागरिक, व्यावसायिक सारेच प्रचंड वैतागलेले आहेत... रामटेक, शीतलवाडी, मनसर, पवनी, देवालापार, रामटेक- मनसर रस्त्यावर मोकाट जनावरांची बसलेल्या झुंडीमुळे वाहतुकीस अडथळा तर होतोच अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे... शहरातील बहुतांश रस्त्यांवर मोकाट जनावरांनी ठिय्या मांडला आहे... परिणामी वारंवार वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच छोट्या- मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे... नगर परिषद व ग्रामपंचायत कडून मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी कुठलीही मोहीम राबविली जात नसल्याचे पहावयास मिळत आहे... विकासाच्या प्रगतीकडे झेपावणाऱ्या रामटेक शहरात सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे झाली आहेत... परंतु, रस्त्यावरच मोकाट जनावरे उभी राहत असल्याने पादचा-यांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे... पावसाळ्याचे दिवस सुरु झालेले असून जनावरे बसणायाकरिया रस्त्यावर येतात... मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे येथील नागरिकांसह येणारे भाविक वाहनधारक तसेच व्यावसायिक पुरते हैराण झाले आहेत... आधीच भटकी कुत्र्याचा उपद्रव आहे, त्यात आता मोकाट जनावरांची डोकेदुखी वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून पुढे येत आहे... रस्त्यावर बसणाऱ्या जनावरांमुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून होणारे अपघात थांबविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे व बेजबाबदार पशुपालकांकडून दंड आकारावा यावा... रस्त्यावर असणाऱ्या जनावरांची सोय करावी व खासगी मालकीचे जनावरे असल्यास मालकावर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी नागरिक, व्यावसायिक प्रशासनांला करीत आहे...

व्यावसायिक झाले त्रस्त

मोकाट जनावरांमुळे आम्ही व्यावसायिक त्रस्त झालो आहोत... रोज सकाळी दुकान उघडताना पहिले या मोकाट जनावरांनी टाकलेले शेण, गोमूत्र साफ्फसफ्फ्राई करावी लागते...त्यामुळे संपूर्ण दुकानात माशी मच्छर व शेणगोमूत्राच्या वासाने आम्ही दुकानदार त्रस्त झालो आहोत...

गुन्हा मालकांवर दाखल करा

मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव बघता ग्रामपंचायतीने केंद्र व राज्यशासनाच्या केंद्र, राज्याचे कायदे पशु क्रूरता नियम व अधिनियम १९६०, मुंबई पोलिस कायदा १९५१ अंतर्गत जनावरांच्या मालकांवर गुन्हे दाखल करावे तसेच बेवारस जनावरांची गोशाळेत रवानगी करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post