माणगाव :- (नरेश पाटील) वारकरी साहित्य परिषद अंतर्गत रायगड जिल्हा संत जनाबाई मुक्ताई महिला हरिपाठ मंडळाचा कार्यकारीणी मेळावा २३ जुलै २०२५ रोजी खांदाड येथील सोनभैरव मंदिरात उत्साही वातावरणात संपन्न झाला... या मेळाव्यास ह.भ.प. विठ्ठल पाटील (काकाजी – संस्थापक अध्यक्ष), ह.भ.प. लक्ष्मण एम. महाराज (जिल्हाध्यक्ष), ह.भ.प. सौ. योगिता ताई मोरे (महिला जिल्हा अध्यक्षा), ह.भ.प. एस.एस. पाटील (संपर्क प्रमुख, सातारा), मा. नगराध्यक्ष ज्ञानदेवजी पोवार, सामाजिक कार्यकर्ते बाळा संतोष मांजरे तसेच विविध तालुक्यांतील मान्यवर उपस्थित होते... “संस्कृती बालपणापासूनच रुजली पाहिजे, म्हणून लहान वयातच धर्म, साधना आणि ध्यान शिकवणे महत्त्वाचे आहे,” असे ज्ञानदेव पोवार यांनी आपल्या भाषणात सांगितले... त्यांनी पाहुण्यांचे स्वागत करत गावाच्या वतीने आभार मानले... अशा कार्यक्रमांची गरज समाजात अधिक आहे, असे नमूद करत, स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होते, हेही त्यांनी अधोरेखित केले...
पोवार यांनी आपल्या मंदिरात ४४ वर्षांपासून चालत असलेल्या सप्ताह सेवेत योगदान देणाऱ्या ज्येष्ठ सेवेकऱ्यांचा सन्मान व्हावा आणि अशा कार्यकर्त्यांसाठी सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचे बाब आत्तापासूनच करावे असे आवाहन केले... “धार्मिक कार्यासाठी निमंत्रणाची गरज नसते; कोणतीही मदत लागल्यास संपर्क साधावा,” असे सांगत त्यांनी आपले भाषण संपवले... या मेळाव्यात महिलांच्या हरिपाठ, स्पर्धांचे नियम, आणि सामाजिक अडचणींवर उपाय यावर सखोल चर्चा झाली. ६ बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि राज्यस्तरीय धार्मिक स्थळ सहलीची संधी दिली जाणार आहे...
