महाराष्ट्र वेदभुमी

वारकरी साहित्य परिषदेच्या रायगड जिल्हा महिला हरिपाठ मंडळाचा कार्यकारीणी मेळावा खांदाड येथे संपन्न


माणगाव (नरेश पाटील) : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य अंतर्गत रायगड जिल्हा संत जनाबाई मृत्ताई महिला हरिपाठ मंडळाचा कार्यकारीणी मेळावा व बैठक खांदाड येथील सोनभैरव मंदिरात बुधवार, दि. २३ जुलै २०२५ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत उत्साही वातावरणात पार पडली...

या मेळाव्यास वारकरी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठल पाटील (काकाजी), रायगड जिल्हाध्यक्ष ह.भ.प. लक्ष्मण एम. महाराज, महिला जिल्हा अध्यक्षा ह.भ.प. सौ. योगिता ताई मोरे, संपर्क प्रमुख ह.भ.प. एस.एस. पाटील (सातारा), मा. नगराध्यक्ष ज्ञानदेवजी पोवार साहेब, तसेच विविध तालुक्यांतील मान्यवर उपस्थित होते...

प्रमुख मान्यवरांमध्ये पुढील मान्यवरांचा सहभाग होता: ह.भ.प. सौ. योगिता ताई मोरे, रायगड महिला जिल्हा अध्यक्षा, ह.भ.प. रमेश बाबू दवडे, माणगाव उपतालुका अध्यक्ष, ह.भ.प. सौ. चेतना शकर शेडगे, माणगाव तालुका महिला अध्यक्षा, ह.भ.प. सौ. सुषमा ताई सुभाष देशमुख, रोहा तालुका महिला अध्यक्षा, ह.भ.प. राम गणपत आबेकर – रोहा तालुका अध्यक्ष, cह.भ.प. चंद्रकांत सखाराम घाडगे, पोलादपूर तालुका अध्यक्ष, ह.भ.प. सौ. सुमन ताई तुकाराम केसकर पोलादपूर महिला तालुका अध्यक्ष, ह.भ.प. प्राभाकर शंकर वाजे, उपजिल्हाध्यक्ष, महाड, ह.भ.प. राम सुतार, ह.भ.प. सुभाष गोविंद जगदाळे निवृत्त तहसीलदार, cह.भ.प. चंद्रकांत यादव,  लोणारे, ह.भ.प. विलास सुतार, ह.भ.प. लक्ष्मण येरेम महाराज, जिल्हा अध्यक्ष, ह.भ.प. राम बाबू गुगुले, ह.भ.प. महेश सुतार आणि ह.भ.प. राजाराम महाराज गगन...

     या वेळी महिलांनी हरिपाठ व सामाजिक कार्याच्या विविध अंगांवर सखोल विचारमंथन केले... हरिपाठ स्पर्धेचे नियम, सहभागी महिलांसाठी संख्यात्मक निकष, सामाजिक अडचणींवर मात करण्याचे उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले... या स्पर्धेसाठी एकूण ६ बक्षिसांची घोषणा करण्यात आली... विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच राज्यस्तरीय कार्यक्रमात सहभागाची संधी दिली जाणार आहे... विजयी मंडळांना पुरस्कार स्वरूपात धार्मिक स्थळांच्या भेटी, प्रवास व इतर प्रोत्साहनात्मक उपक्रम दिले जातील... येत्या ११ नोव्हेंबर २०२५ रोजी (११/११/२०२५) हरिपाठ सादरीकरणाचा विशेष कार्यक्रम नियोजित आहे...

"सर्व प्रवाह अखेरीस एकाच सागरात मिसळतात, तशीच आपली कामगिरी एकत्रित असावी," असे सूचक मार्गदर्शन या वेळी देण्यात आले... संघटनात्मक व्यवस्थापन, नियोजन व खर्च यावर सखोल चर्चा झाली. यंदा एकूण २८ लाख वारकरी पायी दिंडी महाराष्ट्रासह ईतर ५ राज्यांतून एकत्र आले होते यामध्ये महिला मंडळांचाही महत्त्वपूर्ण सहभाग दिसून आले... यावेळी हरिपाठ स्पर्धेला प्रेरणा देणारे आणि कार्यात दिशादर्शक ठरणारे ज्ञानदेव पोवार यांनी आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की, "एकत्रित कार्य, सातत्य आणि भक्तीचा भाव हा वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे..." त्यांचे मार्गदर्शन उपस्थित महिला कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरले... कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन करण्यात आले... संपूर्ण मेळावा भक्तिभावात व संघभावनेत पार पडला. रायगड जिल्ह्यातील महिला हरिपाठ मंडळांचे हे एकत्रीकरण भावी कार्यासाठी दिशादर्शक ठरणार  आहे...

Post a Comment

Previous Post Next Post