उरण प्रतिनिधी:- अजय शिवकर
उरण येथील कामाच्या निमित्ताने शेकडो विद्यार्थी, प्रवाशी आणि कामगार पनवेलला जात असतात...उरण येथून काही १५ मिनिटांनी, अर्ध्या तासांनी किंवा एका तासांनी सुटतात असे एसटी डेपोच्या वेळा पत्रानुसार दिसून येतात परंतु संध्याकाळी ५.४५ ते ७.०० घ्या दरम्यान आठवड्यात २/३दिवस कधीही वेळेवर नसतात असे त्या मार्गावर नियमित प्रवास करणारे सारेच प्रवाशी तक्रार करत आहेत...
ही तक्रार घेऊन कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेचे पदाधिकारी एसटी डेपो च्या व्यवस्थापक आणि अधिकारी दराडे साहेब यांना भेटून साहित्यरत्न रायगडभूषण प्रा एल बी पाटील,तालुका शाखा अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे,सचिव अजय शिवकर,मधुबन कट्टाध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, नाटककार रायगड भूषण किशोर पाटील निवेदन देऊन संध्याकाळी ६ ते ७ च्या दरम्यान ३ गाड्या वेळेवर सोडण्याची विनंती केली...ती विनंती मान्य करून ९ जुलै पासून वेळेवर सोडणार असे शिष्टमंडळास सांगण्यात आले... प्रवाशांना या बातमीने काही प्रमाणात आज तरी समाधान झाले आहे...

