महाराष्ट्र वेदभुमी

महामार्गावर अपघाताचा थरार; तीन गंभीर जखमी

भरधाव आय-२० कारचा टायर फुटला ; कार पलटी

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.४४ वर भरधाव वेगाने येणाऱ्या आय-२० कारचा पुढील टायर अचानक फुटल्याने कार अनियंत्रित झाली. चालकांकडून कारवर नियंत्रण मिळविता न आल्याने भरधाव कार सिनेस्टाईल उडून रस्त्याच्या बाजूला कोसळून पलटी झाली. ही घटना (दि.२) सकाळी ११.३० ला घडली. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहे. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ४४ चोरबाहुली ते मरारवाडी जवळ हा भीषण अपघात झाला. नागपूर दिशेने एमपी २२-सीए-६०७० भरधाव वेगाने जात असलेल्या कारचा टायर अचानक फुटला. यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार अनियंत्रित झाली. यामुळे कार उडत रस्त्याच्या बाजूला कोसळून पलटी झाली. घटनेची माहिती ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी यांना मिळताच कर्मचारी त्रिभुवन सिंग, गणेश बगमारे व कुंजीलाल तुमडाम यांनी घटनास्थळ गाठले यात तीनजण गंभीर जखमी झाले असून रा. शिवनी म.प्र. यांना वाहनाबाहेर काढून रुग्णवाहिकेने मनसर येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात दाखल केले... घटनेचा देवलापार पोलीस तपास करीत आहे...

जखमीना उपचारासाठी रुग्णालयात दाखल

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर ४४ झालेल्या भीषण अपघातात वाहनात असणारे वाहन चालक नंदकिशोर रहांगडाले (वय ५५), विजय शरणागत (वय ३०) व डॉली नंदकिशोर रहांगडाले (वय १७) हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच मनसर येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे...

Post a Comment

Previous Post Next Post