महाराष्ट्र वेदभुमी

रोहा तालुक्यातील खांब विभातील शेतकऱ्यांचा पर्यावरण संवेदनशील क्षेत्राला कडाडून विरोध,

देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे व तळवली ग्रामस्थानी बैठक घेत संताप केला व्यक्त.

कोलाड (श्याम लोखंडे) रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यात इको सेन्सेटिव्ह झोन टाकण्यात आल्याचा मसुदा तहसील कार्यालयाकडून जारी करण्यात आला असून रायगड जिल्ह्यातील तब्बल 437 गावे ही इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये येत असल्याचे केंद्रशासनाच्या मसुदामध्ये आहे. रोहा तालुक्यातील 119 गावांना वन व पर्यावरण विभागाने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे संवेदनशील गावे म्हणून घोषित केली आहेत..

तर इको सेन्सेटिव्ह झोन घोषित करण्यात आले आहे. त्यापैकी चिल्हे तलाठी सजा अंतर्गत देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे व तळवली व बाहे ही अशी गावे आहेत कि,त्या गावापासून पर्यावरणाला हानी पोहचविण्यासारखी परिस्थिती नाही. असे असताना देखील केंद्र शासनाने या गावांची नावे घेतल्याने ग्रामस्थानी एकच संताप व्यक्त केला असून रविवारी 6 जुलै रोजी सायंकाळी धानकान्हे येथील हनुमान मंदिर सभागृहात बैठक घेत इको सेन्सेटिव्ह झोनला सर्वानुमते विरोध दर्शवला आहे...

या संदर्भात रविवारी धानकान्हे येथे बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला चिल्हे तलाठी सजा अंतर्गत तळवली, चिल्हे , धानकान्हे, देवकान्हे , बाहे, येथील ग्रामस्थ तसेच शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते तर या बैठकीत रोहा प्रांताधिकारी यांना येथील ग्रामस्थ इको सेन्सेटिव्ह झोनला विरोध असल्याचा अर्ज तथा निवेदन लवकरच दाखल करणार असल्याचा एकमेव ठराव मंजूर करून ते सदरील तहसीलदार, प्रांत अधिकारी, जिल्हाअधिकारी यांना सादर करत रायगडचे लोकसभा खासदार सुनील तटकरे व राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, मंत्री ना. अदिती तटकरे व जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे त्याच बरोबर जिल्ह्यातील आमदार यांचेकडे दाद मागणार असल्याचे उपस्थित बैठकीत ग्रामस्थ शेतकरी वर्ग यांच्या वतीने सांगण्यात आले आहे...

तालुक्यातील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे व तळवली ही गावे वर्षानुवर्ष कोलाड पाटबंधारे विभाग (जलसंपदा विभाग) यांच्या अंतर्गत कालव्याच्या पाण्याच्या ओलिताखाली असणारी शेत जमीन आहे, या विभागात कोणत्याही दगडखाणी नाहीत, अभयारण्ये नाहीत किंवा कोणत्याही प्रकारे पर्यावरणाचा -हास होईल असे कोणतेही काम येथील परिसर आणि गावांमध्ये होत नाही. तरी ये ग्रामस्थांवर हा अन्यायक लादला जात असलेल्या तसेच घोषित करण्यात आलेले पर्यावरण संवेदनशील क्षेत्र हे रद्द करावे असे ग्रामस्थ नागरिकांकडून कडाडून विरोध दर्शविन्यात येत आहे...

शासनाचे पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय,भारत सरकार,नवी दिल्ली यांनी पर्यावरण संवेदनशील घोषित क्षेत्र घोषित करण्यासाठी क्र.s.O.३०६०(E) dated ३१ जुलै २०२४ अन्वये रायगड जिल्ह्यातील ७ तालुक्यातील ४३७ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामध्ये रोहा तालुक्यातील  तळाठी सजा चिल्हे मधील देवकान्हे, धानकान्हे, चिल्हे व तळवली आदी गावांचा समावेश आहे. येथील ग्रामस्थ या निर्णया विरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून शासनाने आमच्या पत्राद्वारे ऐकले नाही तर प्रसंगी आम्ही सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करू असा इशारा सदरच्या आयोजित बैठकीतून kiप्रशासनाला देण्यात आले आहे...

प्रतिक्रिया 

आपला भाग हा आदिपासूनच ग्रीन झोन आहे तसेच येथील ग्रामस्थ दुबार भात पीक तसेच कडधान्य पीक त्याच बरोबर शेतीपूरक म्हणून भाजी पाळा लागवड करत व्यवसाय करतात त्यामुळे येथील ग्रामस्थ शेतकरी यांच्या कडून पर्यावरणाला धोका निर्माण होईल अशी कोणतीच गोष्ट करत नाही तरी देखील शासनाने येथील गावांवर अन्याय दर्शवित हा भाग वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा परिपत्रक जारी केला असून तो रद्द करण्यात यावा अशी माहिती किशोर भोईर यांनी व्यक्त केली...

प्रतिक्रिया 

आपल्याला वेळेच आवाज उठविण्याची गरज आहे तसेच येथील शेतकरी ग्रामस्थ यांना विश्वासात न घेता वन पर्यावरण संवेदनशील सर्व्हे करत येथील ग्रामस्थ शेतकरी यांच्यावर सरकारच्या वतीने अन्याय होत आहे त्यामुळे सर्वांनी संघटित होऊन याला विरोध दर्शवित हे लादण्यात आलेले इको सिन्स्विटी झोन रद्द करण्याच्या भूमिकेवर ठाम राहणे आवश्यक आहे...जगदीश जाधव

प्रतिक्रिया 

अन्यायावर न्याय मिळेपर्यंत कोणी ही मागे हटणार नाही निवेदन देऊ वेळ पडल्यास आंदोन छेडण्यात येईल आम्ही पारंपरिक शेत जमीन लागवड करणारे शेतकरी आहोत तसेच पर्यावरणाला तसेच पशु प्राणी पक्षी यांना कोणताही धोका निर्माण होईल असे काही नाही - धनाजी लोखंडे...

Post a Comment

Previous Post Next Post