माणगाव :- (नरेश पाटील) रा.प. रोहा आगारात जागतिक पर्यावरण दिनी, गुरुवार दिनांक ५ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, “ एसटी डेपो रोहा आणि रोहा चर्च..." यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडला... पर्यावरणाच्या संवर्धनासाठी सार्वजनिक आणि सामाजिक सहभागातून राबवलेला हा उपक्रम भविष्यासाठी निसर्गप्रेमाचा संदेश देणारा ठरला. या उत्सवमय कार्यक्रमात रोहा परिसरातील मान्यवर अधिकारी आणि स्थानिक प्रशासन प्रमुखांनी उपस्थित राहून स्वतः वृक्षारोपण करून पर्यावरणप्रेमाचे उदाहरण समाजासमोर ठेवले...
यावेळी प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवल, डीएफओ शैलेंद्रकुमार जाधव, तहसीलदार किशोर देशमुख, डेप्युटी इंजिनिअर व्ही. आर. बागुल, शाखा अभियंता ए. एम. पाटील, ज्युनिअर शाखा अभियंता एम. एम. घाडगे आणि वनपाल डी. बी. वाघे यांनी वृक्षारोपण केले... याप्रसंगी प्रांताधिकारी खुटवल यांनी मार्गदर्शन करताना पर्यावरणाच्या सध्याच्या संकटांविषयी उपस्थितांमध्ये जागरूकता निर्माण केली... त्यांनी सांगितले की, “वृक्षलागवड ही केवळ एक औपचारिकता नसून, ती भावी पिढ्यांसाठी एक नैतिक जबाबदारी आहे...वाढत्या शहरीकरणामुळे हरित पट्ट्यांची संख्या कमी होत चालली आहे, त्यामुळे अशा उपक्रमांचे आयोजन ही काळाची गरज बनली आहे...” त्यांनी पुढे असेही नमूद केले की, “यंदाच्या वेळेवर आणि पुरेशा पावसामुळे या झाडांना वाढीसाठी योग्य हवामान लाभले असून, यापुढे त्यांचे संरक्षण हे आपल्या सगळ्यांचे सामूहिक कर्तव्य आहे...” या उपक्रमात "स्नेहवर्धिनी सामाजिक संस्था..." या संस्थेच्या महिला सदस्यांनी विशेष सहभाग घेतला... त्यांचा सक्रिय आणि स्वयंप्रेरित सहभाग एक सामाजिक ऐक्य आणि सहभागाचे उत्कृष्ट उदाहरण ठरले... लहान मुलांनीही उत्साहाने सहभाग घेतल्यामुळे परिसरात आनंददायी आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. रा.प. रोहा आगारातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने या उपक्रमासाठी संयोजन आणि सहभाग दिला. यामध्ये आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार, स्थानक प्रमुख अजिंक्य रोहेकर, आगार लेखापाल विकास खाडे, वरिष्ठ लिपिक प्रियांका चव्हाण, वाहतूक नियंत्रक हेमंत कदम, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक स्वप्निल पवार, तसेच वाहतूक नियंत्रक नेथू गावित व छाया घोरपडे यांचा समावेश होता... वृक्षलागवड ही केवळ प्रतिकात्मक नव्हे, तर वास्तवात पर्यावरण रक्षणाचा पाया असते... या उपक्रमातून केवळ रोपांची लागवड झाली नाही, तर पर्यावरणाविषयीचा एक सामूहिक संकल्प तयार झाला... समाजातील प्रत्येक घटकाने अशा उपक्रमांमध्ये सहभागी होणे, ही काळाची गरज आहे... या कार्यक्रमाने केवळ परिसर हिरवागार करण्याचा उद्देश साधला नाही, तर लोकांच्या मनात पर्यावरणाविषयी संवेदनशीलता आणि जबाबदारी जागृत केली... अशा सामूहिक प्रयत्नांतूनच शाश्वत विकासाची वाटचाल शक्य आहे...
