महाराष्ट्र वेदभुमी

मतदार राजा तुझं मत कोणाला जातय? ईव्हीएम मशीन हॅक करता येते, निकाली फिरवता येतो!

  


अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या हाती पुरावे, तुळसी गब्बार्ड यांचा खळबळजनक दावा

 कांतीलाल पाटील :  महाराष्ट्र वेदभुमी वृत्तपत्रसेवा 

वॉशिंग्टन,अमेरिका दि.२५ : भारत देशांमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत ईव्हीएम मशीन घोटाळा चा आरोप विरोधी पक्षाकडून सतत होत असताना ईव्हीएम मशीन हॅक करता येते आणि निवडणुकीचा निकाल फिरवता येतो याचे पुरावे हाती लागले आहेत असा  खलबल जनक दावा अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुळसी गब्बार्ड यांनी केलेला आहे...

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच सन 2020 च्या निवडणुकीतील सीआयएसएचे तत्कालीन संचालक ख्रिस क्रेब्स यांच्या भूमिकेबद्दल चौकशीचे आदेश दिले आहेत आणि आता ईव्हीएम बाबत पुरावे आमच्या हाती लागले आहेत आमच्यासाठी हे मोठे यश आहे असे वक्तव्य तुलसी गब्बार्ड यांनी केले...

 बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात

इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धती पूर्णपणे असुरक्षित आहे या पद्धतीने होणाऱ्या मतदानावर सहज फेरफार करता येते असे तपासात उघड झाले आहे.हॅकर्स साठी हा डाव्या हाताचा खेळ आहे..

त्यामुळे मतदाराचा निवडणुकीवर व्यवस्थेवर विश्वास कायम राखायचा असेल आणि निवडणूक पारदर्शक होण्यासाठी देशभरात बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची आवश्यकता आहे...

Post a Comment

Previous Post Next Post