महाराष्ट्र वेदभुमी

अलिबाग पनवेल विनावाहक बसचा जिते गावाजवळ अपघात, काही प्रवासी जखमी,

सोगाव-: अब्दुल सोगावकर-: अलिबाग बस स्थानकातुन बुधवार दि. २५ जून रोजी सकाळी ६:४५ वाजता अलिबाग वरून सुटलेली अलिबाग ते पनवेल विनावाहक अशी जाणारी एम एच ०६ बी डब्ल्यू ४३७३ या क्रमांकाची शिवसाई बसचा मुंबई गोवा महामार्गावर पेण ते पनवेल दरम्यान जिते गावाजवळ सकाळी आठ वाजताच्या सुमारास ट्रकला पाठीमागून ठोकल्यामुळे भीषण अपघात झाला आहे...

     या बसमध्ये एकूण २० प्रवासी प्रवास करत होते, अपघातानंतर काही प्रवाशांना किरकोळ स्वरूपात जखमा झाल्या आहेत तर काही प्रवाशांना मुका मार लागला असल्याची प्राथमिक माहिती प्रवाशांनी आमच्या प्रतिनिधीकडे बोलताना दिली आहे. अपघातानंतर बसचा दरवाजा उघडता येत नसल्याने सर्व प्रवाशांना ड्रायव्हर बाजूने बाहेर काढण्यात आले. यानंतर सर्व प्रवाशांना पाठीमागून येणाऱ्या बस मध्ये बसवून मार्गस्थ करण्यात आले आहे...

फोटो लाईन : मुंबई गोवा महामार्गावर जिते गावाजवळ अपघातग्रस्त अलिबाग पनवेल विनावाहक शिवसाई बस,

Post a Comment

Previous Post Next Post