महाराष्ट्र वेदभुमी

गंगा दशहरा पर्वावर लक्ष दिव्यांनी उजळला अंबाळा घाट

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक : विदर्भाची काशी व धार्मिक महत्व असलेल्या अंबाळा येथे दरवर्षीप्रमाणे गंगा दशहरा दीप मोहत्सवाचे गुरूवार, ५ जून रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजन करण्यात आले. दीप पूजणानंतर पाण्यात सोडल्या जाणाऱ्या असंख्य ज्योतींच्या मंद प्रकाशात अंबाळा तलावात नयनरम्य दृष्य तयार झाले .गंगा दशहरा दीप मोहत्सवाला सायंकाळी ६ वाजता दरम्यान तलावाच्या सभोवती भाविक गर्दी करीत, 'जय जय गंगे' जयघोष करीत ज्योती विसर्जित करतात आल्या. महोत्सवाचे आयोजन भारतीय जनसेवा मंडळ आणि जनतेच्या सहकार्याने करण्यात आले. संध्याकाळी ४ वाजता अगस्ती आश्रमाच्या अखंड ज्योतीमधुन दुसरी ज्योत प्रज्वलीत करण्यात आली. ही ज्योत जैन मंदिर, बर्वे शाळा, झेंडा चौक, गांधी चौक, लंबे हनुमान मंदिर मार्गाने वाजत-गाजत मिरवणूक अंबाळा येथे पोहचल्यावर संध्याकाळी ७ ते ७.३० पर्यंत स्थानिक ब्राम्हन पंडितांद्वारे वेद मंत्रच्चार, गंगा स्त्रोत गंगा पूजन व महाआरती झाली. त्यानंतर अखंड जोतीच्या अग्नीने हजारों दिपज्योती प्रज्वलीत करून अंबाळा तलावाच्या सर्व दिशांनी प्रज्वलीत दिवे तलावात सोडण्यात आले. रुनमोचेश्वर भजन मंडलके संगीतमय भजन झाले. गंगादशहरा उत्सव निमित्य तुरखेडी आश्रमचे संत ज्ञानिदास महाराज म्हणाले  की वेद ग्रंथ मध्ये अगस्ती आश्रमच्या उल्लेख आहे. अगोदर अगस्ती आश्रम होते. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी गंगादशहरा उत्सव आयोजनला बदल भारतीय जनसेला मंडलाळाची प्रशंसा केली व म्हणाले की संत गोपालबाबाची परंपरा चालू आहे. यात गर्व आहे. ते म्ह‌णाले की अंबाळा तलावाचे काम लवकरच पूर्ण करायाच्या प्रयत्नं सुरु आहे. भारतीय जनसेवा मंडळाचे सचिव व माजी आमदार डी. मल्लिकार्जून रेड्डी म्हणाले की अगस्ती मुनी आश्रम धार्मिक व ऐतीहासीक वारसा आहे. तेथे ज्ञानिदास महाराज सारख्या चांगल्या संताची व्यवस्था व्हायला पाहीजे. यावेळी राज्यमंत्री आशिष जैसवाल, संत ज्ञानीदास महाराज तिरखेड़ी, कैलासपुरी महाराज, विष्णुगिरी महाराज, स्वामी शिव प्रेमानंद, प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रम नेत्रादीपक व्हावा यासाठी भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, सचिव डी. मल्लिकार्जुन रेड्डी, धनराज काठोके, चंद्रकांत ठक्कर, सुभाष बघेले, शेखर बघेले, ऋषिकेश किंमतकर, नत्थू घरजाळे, शंकरराव चामलाटे, विनायक डांगरे, ब्राह्मण वृंद आणि रामटेककर नागरिक, इतर संत मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, दिवंगत गोपाल बाबा यांनी गंगा दशहरा उत्सवाला सुरू केली होती...

Post a Comment

Previous Post Next Post