महाराष्ट्र वेदभुमी

सुविधांपेक्षा अडचणीच अधिक : हमीभाव केंद्रावरच नाही पैशाची हमी

९९ शेतकऱ्यांचे सव्वा कोटी थकीत कधी मिळणार?

सचिन चौरसिया रामटेक

रामटेक :- खरीपपेक्षा जास्त मेहनतीचा रब्बी धान असतो... व्यापाऱ्यांची मनमानी होऊ नये शिवाय शेतीमालाला हमी भाव मिळून शेतकऱ्यांचे हीत साधता यावे म्हणून हमी भाव केंद्राची उभारणी केली जाते... विक्रीसाठी आवश्यक असलेली प्रक्रिया करुन शेतकरी या खरेदी केंद्रांचा आधार घेतात पण तालुक्यातील पवनी येथील धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करुन १ महिन्यांचा कालावधी लोटला असून एकट्या पवनी धान खरेदी केद्रावरील सव्वा कोटीच्या घरात धानाचा चुकारा थकीत असल्याचे समोर आले आहे... सदर चुकारा हा ९९ शेतकऱ्यांचा आहे... रामटेक तालुक्यातील देवलापार क्षेत्र धान उत्पादक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाते... खरीप पिकाचा चार कोटीचा बोनस अद्यापही मिळाला नाही... तर रब्बी धान पिकाचे सव्वा कोटीच्या घरात चुकारा थांबल्याने पून्हा एक चटका शेतकऱ्यांना लागला आहे...

सदर धान खरेदी केद्र आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येत असून याचा कारभार सुभाष मडावी पाहतात... देवलापार क्षेत्रात पवनी येथे धान खरेदी केद्र आहे...यावर्षी या केंद्रावर १५३ शेतकऱ्यांनी रब्बी धान विक्रीकरीता नोंदणी केली... सदर केद्रावर २१ मे पासुन धानाची खरेदी सुरु झाली १५३ पैकी आतापर्यत ९९ शेतकऱ्यांनी ५ हजार ५०० क्विंटलच्या घरात धान विकला... त्याची किंमत २ हजार ३०० प्रती क्विंटलच्या दराने सव्वा कोटीच्या आसपास होते. खरेदी सुरु होवून सदर रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहे... शेतकऱ्याजवळ पैसा नसल्याने शेतीची कामे कशी करावी हा प्रश्न निर्माण झाला आहे... खरीपीच्या तुलनेत रब्बी धानाला फार मेहनत करावी लागते... त्यामूळे सर्वच शेतकरी रब्बी धानाचे पीक घेत नाही... सदर पीक हे उन्हाळ्यात येत असल्याने भरपूर पाणी लागते तर उन्हामुळे पाणी गरम येत असल्याने बांध्यातील पाणी वारंवार बदलावे लागते परंतू त्याची झळ आदिवासी विभागाला कशी पोहचणार हा प्रश्न परीसरातील शेतकरी करीत आहे...

धानाचे पऱ्हे टाकण्याची वेळ आली आहे... पऱ्हे टाकण्याकरीता धानाच्या बियाणाची गरज असते. परंतू धानाचे चुकारे अद्याप न मिळाल्याने बियाने तसेच त्याकरीता लागणारे खत घेण्याकरीता पैसे आणायचे कुटून हा प्रश्न निर्माण झाला आहे, गजानन बिसने धान उत्पादक शेतकरी, करवाही

हमी भाव मिळत असल्याने शेतकरी धान खरेदी केंद्रावर धान विकतो.परंतू आदिवासी विकास विभाग वेळेवर चुकारे देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. बियाने व खत खरेदी करायचे कसे ही गंभीर समस्या आहे...गणेश अवथरे, प्रगतीशील धान उत्पादक बेलदा

Post a Comment

Previous Post Next Post