महाराष्ट्र वेदभुमी

समाजासाठी एक आठवडा, पण परिणाम दीर्घकाळ टिकणारे – पोस्कोचा वॉलंटिअर वीक

 

माणगाव : (नरेश पाटील)–: पोस्को कंपनीने दरवर्षीप्रमाणे यंदाही २२ मे ते ३१ मे २०२५ या कालावधीत ‘ग्लोबल वॉलंटिअर वीक’ उत्साहात साजरा केला. या उपक्रमांतर्गत जगभरातील पोस्कोच्या युनिट्समधील कर्मचारी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांत सहभागी झाले... वस्तूदान अथवा सेवा पुरविण्यापलीकडे जात, समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा हा प्रयत्न होता...

विशेष म्हणजे पोस्को महाराष्ट्र स्टील युनिटने यावर्षी समाजाभिमुखतेचा नवा आदर्श निर्माण करत सात प्रभावी उपक्रम राबवले... ही केवळ सामाजिक जबाबदारी नव्हे, तर एक जिवंत मूल्यसंस्था असल्याचे त्यांनी दाखवून दिले.... कॉर्पोरेट क्षेत्रात अत्युच्च नीतिमूल्ये आणि मानवी संवेदना जपणारी कंपनी म्हणून पोस्को महाराष्ट्र स्टीलचे नाव आज अग्रस्थानी आहे...

वृक्षारोपण मोहिमेत २५ शेतकऱ्यांना १९ प्रकारच्या एकूण २५० औषधी, मसालेदार व उपयोगी रोपांचे वाटप करून पर्यावरणपूरक उपजीविकेचा आदर्श घालून दिला. माणगाव येथील वनवासी कल्याण आश्रमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व एका महिन्याचे अन्नधान्य पुरवून शिक्षण आणि पोषण या मूलभूत गरजांना हातभार लावण्यात आला... परिसरात वृक्षारोपणही करून निसर्गसंवर्धनाचा संदेश दिला...

बोरवाडी येथील माऊली वृद्धाश्रमातील ३० ज्येष्ठ नागरिकांना किराणा साहित्य देऊन केवळ भौतिक मदत नव्हे, तर त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारी माणुसकीची जाणीव पोस्कोच्या स्वयंसेवकांनी दिली... पुण्यातील ज्ञानदा गुरुकुल संस्थेत विद्यार्थ्यांशी संवाद, कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) विषयावरील माहिती सत्र आणि स्टेशनरी, अन्नधान्य वाटप आयोजित करण्यात आले — जे आजच्या तंत्रज्ञानयुगात बालमना समोर दिशा देणारे ठरले...

सुराज्य प्रकल्पात मुलांसाठी गाणी, गोष्टी, बिस्किट वाटपासोबत शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वितरण करून त्यांच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलण्यात आला... ग्रीन सनराईज हिल्स परिसरात ३५ स्वयंसेवकांनी परिसर स्वच्छता केली, झाडांची निगा राखली आणि १०० झाडे लावण्याचा संकल्प करून 'स्वच्छ आणि हरित भवितव्या'ची बीजे रोवली...

‘सेवादीप’ संस्थेसोबत कपडे, स्टेशनरी, खेळणी आणि इतर साहित्य गरजूंना वितरित करताना समाजातील वंचितांशी आपुलकीची नाळ जोडण्याचा प्रयत्न झाला... विशेषतः, या सर्व उपक्रमांमध्ये १०० हून अधिक पोस्को कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी स्वतःच्या वेळेतून वेळ काढून अत्यंत मनापासून सहभागी झाले, हे विशेष उल्लेखनीय आहे...

पोस्को महाराष्ट्र स्टील केवळ एक औद्योगिक कंपनी नाही, तर ती सामाजिक परिवर्तनाची एक जबाबदार आणि संवेदनशील शक्ती आहे... त्यांचा सीएसआर उपक्रम ही एक औपचारिकता नसून, माणसांमध्ये माणुसकी रुजवण्याची चळवळ आहे... त्यांनी राबवलेले हे उपक्रम समाजासाठी दीपस्तंभ ठरत आहेत... शाश्वत विकास, सामाजिक समावेश आणि पर्यावरण संवर्धन यांचे सुंदर त्रैविक समीकरण पोस्कोने साकारले आहे...

या आठवड्याच्या निमित्ताने पोस्कोने कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या (सीएसआर) चौकटीपलीकडे जाऊन समाजासाठी दिलेली ही सेवा, माणुसकी आणि सामाजिक समावेशकतेचा आदर्श ठरली आहे... पोस्को महाराष्ट्र स्टीलसारख्या कंपन्यांमुळेच आजचे उद्योग जगत केवळ नफा कमावणारे नसून, समाजात मूल्य निर्माण करणारेही ठरते...

Post a Comment

Previous Post Next Post