महाराष्ट्र वेदभुमी

पर्यटकासोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:- गडमंदिर पार्किंग परिसरात उभ्या असलेल्या स्कार्पियो कारला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना (दि.०२ ) सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली... आगीत कार पूर्णतः जळून खाक झाली... सविस्तर वृत्ताचे की नागपूर येथील गजानन आरडे रा. त्रिमूर्ती नगर नागपूर  यांच्या स्कार्पियो गाडी क्रमांक एमएच २३ ई ४७७४ गाडी भाड्याने घेऊन मोहन वगारे रा. नागपूर हे  रामटेक गडमंदिर येथे देव दर्शनाकरीताआलेले होते... गाडी चालक राजेंद्र तडस रा. त्रिमूर्ती नगर नागपूर हे सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास रामटेक गडमंदिर परिसरामध्ये पोहोचताच गाडीतून धुर निघत असल्याचे चालकांचा लक्षात येताच चालकांने त्वरीत गाडी थांबवून गाडीत बसलेले सर्वाना तातडीने खाली उतरीण्यास सांगितले सर्वजण खाली उतरत असतांनी आग लागलेल्या स्कार्पियो गाडीने मोठ्याप्रणात पेट घेतली होती... नगरपरिषद अग्निशामक दल पाचारण करण्यात आले पण अग्निशामक दल पोहचण्या आधीच काही क्षणातच स्कार्पियो गाडी जळून खाक झाली होती... सदर घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी  घटना स्थळी दाखल होऊन पुढील तपास करीत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post