महाराष्ट्र वेदभुमी

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती नवनियुक्त राज्याध्यक्ष प्रसाद म्हात्रे सर यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर): "त्याग निष्ठा व सेवा" हे ब्रीदवाक्य असणारी "शिक्षक विद्यार्थी यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी" महाराष्ट्रातील लोकप्रिय शिक्षक संघटना म्हणजे महाराष्ट्र राज्य आदर्श  शिक्षक समिती. जी सातत्याने शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यात राज्यात अग्रेसर असते...

या संघटनेच्या सर्वोच्य म्हणजेच राज्याध्यक्ष पदी विद्यमान कोकण विभाग अध्यक्ष प्रसाद अनंत म्हात्रे यांची छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्य कार्यकारणीच्या महामंडळ सभेमध्ये एक मुखाने एकमताने निवड करण्यात आली...

रायगड जिल्हा संघटनेसाठी ही एक अभिमानाची बाब असल्याने दिनांक २१ जून २०२५ रोजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी पेण  येथे प्रसाद म्हात्रे सरांचा सत्कार करण्यात आला...

कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन व ईशस्तवनाने करण्यात आली... रायगड जिल्हा सरचिटणीस सुरेंद्र मनवे यांनी आपल्या प्रास्ताविक पर मनोगतामध्ये प्रसाद म्हात्रे सरांच्या संघटनात्मक कारकीर्दीचे भरभरून कौतुक केले...

जिल्हाध्यक्ष अजय कापसे जिल्हा कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील, जिल्हा समन्वयक संतोष यादव, पनवेल तालुकाध्यक्ष व पेण सोसायटी व्हाईस चेअरमन आनंद पाटील, रोहा तालुकाध्यक्ष नारायण गायकर, माणगाव तालुकाध्यक्ष संतोष मालोरे , पेण सरचिटणीस मनोज ठाकूर, पेण सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक मोहन भोईर, रवींद्र पाटील, विठोबा पाटील , सेवानिवृत्त शिक्षक ज.शं.घरत, पांडुरंग भोपी, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी रा.ना.पाटील, अशा विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि प्रसाद म्हात्रे सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...

जिल्हाध्यक्ष अमिता बामणे यांनी राज्याध्यक्षांना शुभेच्छा देताना विद्यार्थिनींचा गणवेश संदर्भात एक प्रश्न देखील त्यांच्यासमोर मांडला. राज्याध्यक्ष्यांनी तो विषय शासन स्तराव मांडणार असल्याचे सर्वांसमक्ष जाहीर केले...

जिल्हाध्यक्ष अजय कापसे यांनी सर्वप्रथम एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्व शिक्षक बंधू-भगिनींना धन्यवाद दिले...श्री.प्रसाद म्हात्रे यांना राज्याध्यक्षपदी नियुक्ती दिल्याबद्दल राज्य कार्यकारणीचे धन्यवाद व्यक्त केले...

जिल्हास्तरावर शिक्षक विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागत आहेतच पण यापुढे शासन स्तरावर देखील प्रसाद म्हात्रे सरांच्या खांद्याला खांदा लावून प्रश्न सोडविणार असल्याचे सांगितले...

खूपच कमी कालावधीमध्ये संघटनेचा सबंध जिल्हाभर प्रचंड वेगाने विस्तार केल्याबद्दल जिल्हाध्यक्षांनी तालुका कार्यकारणी व जिल्हा कार्यकारणीचे, पदाधिकाऱ्यांचे, सभासदांचे विशेष धन्यवाद व्यक्त केले...

    नवनियुक्त राज्याध्यक्ष प्रसाद म्हात्रे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ३० वर्ष संघटनेमध्ये, चळवळीमध्ये सक्रिय राहून शिक्षकांच्या प्रश्नाबाबत आवाज उठवण्याचं काम कसं केलं या बाबतीत सोदाहरण सांगितले... छत्रपती संभाजीनगर येथे  राज्यकार्यकारणी ने एवढी मोठी जबाबदारी खांद्यावर दिली... त्याबद्दल त्यांनी राज्याचे आभार मानले... तसेच या पदाला १००% न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार याची ग्वाही सर्वांसमोर दिली... आपल्या आई-वडीलांचे आशीर्वाद, सौभाग्यवती चा त्याग आणि कायम साथ आणि कुटुंबाचा नेहमीच मिळणारा आधार यामुळे आज इथपर्यंत जाऊ शकलो हे मनोगतात म्हटले... शिक्षक, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यापुढे दुप्पट ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले...

यापूर्वी लढा देऊन शिक्षकांची कोणती अपूर्ण कामे पूर्ण केली त्याबाबत काही खुलासे त्यांनी केले... एवढ्या मोठ्या संख्येने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सदिच्छा, शुभेच्छा देण्यासाठी आल्याबद्दल त्यांनी सर्व शिक्षक बंधू भगिनींचे धन्यवाद व्यक्त केले...

सदर सत्कार सोहळ्यासाठी...

नवनियुक्त राज्यअध्यक्ष श्री प्रसाद म्हात्रे सर, रायगड जिल्हाध्यक्ष अजय कापसे सर, जिल्हा कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील सर, जिल्हा महिला अध्यक्षा अमिता बामणे मॅडम ,जिल्हा सचिव सुरेंद्र मनवे सर, जिल्हा समन्वयक संतोष यादव सर, जिल्हा कार्यालयीन चिटणीस किशोर जाधव सर, जिल्हा प्रसिद्धि प्रमुख प्रसाद साळवी सर, तसेच पेण, पनवेल, माणगाव, रोहा, मुरुड, सुधागड, अलिबाग, श्रीवर्धन, महाड चे

सर्व तालुकाध्यक्ष, तालुका कार्यकारणी पदाधिकारी, सभासद, शिक्षक बंधू भगिनी प्रचंड संख्येने उपस्थित राहिले...

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणगाव तालुका उपाध्यक्ष दयानंद ठाकूर यांनी केले व जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद साळवी यांनी आभार मानले...

Post a Comment

Previous Post Next Post