माणगांव :- (नरेश पाटील) : मुंबई गोवा महामार्गवर गुरुवारी दि. 05 जून रोजी सकाळी एक थरारक अपघात घडला. लोनेरा पासून हाकी हाकेचा अंतरावर असणारा टेंपपाले गावाजवळील उड्डाणपुलावर एका ट्रकने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली आणि धडक दिल्यानंतर ट्रक थेट कारवर कोसळला... या भीषण अपघातात कारमधील चारजण जखमी झाले असून सुदैवाने दोन्ही वाहने पुलावरच अडकली आणि खाली कोसळण्यापासून बचावली...
अपघाताची तीव्रता आणि दृश्य इतकी भीषण होती की काही क्षणांमध्येच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली... ही घटना गोरेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील टेंपपाले गावाजवळ ५ जून रोजी सकाळी सुमारे ८ वाजता घडली...
महाडहून माणगांवकडे येणारा ट्रक (क्रमांक MH12 HD 3833) चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समोरून येणाऱ्या कारवर (क्रमांक MH08 ON 6787) आदळला... धडकेनंतर ट्रक कारवरच कोसळला... सुदैवाने ट्रक व कार दोन्ही पुलावरच अडकल्याने मोठा अनर्थ टळला... कारमधील चारजण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे...
पोलीस प्रशासनाचा तपास सुरू
घटनेनंतर गोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची चौकशी सुरू आहे... ट्रकचा ब्रेक फेल झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यासंदर्भात अधिक तपशील पोलीसांकडून अपेक्षित आहे..
या अपघातामुळे रस्ते सुरक्षा व वाहनांची देखभाल ही किती आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे... मोठ्या वाहनांची नियमित तपासणी, चालकांचे प्रशिक्षण आणि उड्डाणपुलावरील वाहतुकीसाठी विशेष नियमांची अंमलबजावणी ही काळाची गरज आहे...
या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी अशा अपघातातून धडा घेऊन भविष्यातील दुर्घटना टाळण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे...
