महाराष्ट्र वेदभुमी

प्राध्यापक सुधीर खरड किट्समधून सेवानिवृत

 

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक : कविकुलगुरू इंन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलाजी अँड सायन्स ( किट्स) रामटेक मधून ज्येष्ठ प्राध्यापक सुधीर खरड ३१ मे  २०२५ ला सेवानिवृत झाले. त्यानी  किट्सच्या इलेक्ट्रॉनिकस अँड कम्युनिकेशन विभाग मधे प्राध्यापक पदावर ३६ वर्षे सेवा केली. एक उत्तम शिक्षक अशी त्यांची ख्याती आहे. त्यानिमित्य इलेक्ट्रॉनिकस अँड कम्युनिकेशन विभाग तर्फे त्यांचा सेवानिवृती वर गौरव करण्यात आला. यानिमित्त प्राचार्य डॉ.अविनाश श्रीखंडे, विभाग प्रमुख डॉ पंकज आष्टनकर तसेच इतर प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विविध विभागाचे विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी खरड सरांसोबतच्या आपापल्या अनुभवाचा उल्लेख करून त्यांची प्रशंसा केली. प्राचार्य डॉ.अविनाश श्रीखंडे म्हणाले की प्राध्यापक सुधीर खरड यांनी सेवानिवृत्तिच्या शेवटच्या दिवसापर्यंत संस्थेकरिता प्रामाणिक व तत्परतेने  सेवा दिली. सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक सुधीर खरड म्हणाले संस्थाचे हित सर्वोत्तपरी आहे. मला या प्रवासात किट्सचे प्रबंधन, प्राचार्य, मित्र व सर्व कर्मचाऱ्यांनी मदत केली. सर्वांनी संस्थेच्या विकासाकरीता तत्पर राहावे. संचालन व आभार डॉ. स्नेहल मालोदे यांनी केले....

Post a Comment

Previous Post Next Post