लाखो रुपयांचे संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- तहसील अंतर्गत लोहडोंगरी येथील गावालगत असलेल्या गावठाणातील झोपडयाला लागलेल्या आगित ५ झोपडया जळून खाक झाल्या. या आगीत प्राणहानी झाली नसली तरी लाखों रुपयांचे संसारोपयोगी वस्तूंसह कागदपत्रे जळून खाक झाली आहे... ही घटना शुक्रवार रोजी रात्रीला दिडचा सुमारास घडली... या घटनेने पाच झोपड्यांवरील कुटुंब रस्त्यावर आले आहे. नुकसान झालेल्या मधे सायजा प्रल्हाद उइके, मनोज श्रावण बावने, करुणा रितेश कोडवाते, महेश राजेन्द्र नेवारे, राजकुमार तेजराम बाहेश्वर यांचा समावेश आहे. प्रशासनाला झोपड्यांना आग लागल्याची माहिती मिळाली...आगीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याकरीता तलाठी निर्मला हारोडे व महसूल सेवक कैलास सहारे पाठवण्यात आले... आगीमध्ये ज्या पाच झोपड्याधारकांचे नुकसान झाले त्यांना तत्काळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला असून आगीमध्ये झालेले नुकसानाचे योग्य ते मदत करण्याच्या प्रयत्न करीत आहो, असे तहसीलदार रमेश कोळापे यांनी सांगितले. या वेळी सरपंच राजेश कुंभरे, उपसरपंच राहूल धांडे, पोलिस पाटिल पाडुरंग चोखाद्रे, जितेंद्र गजभिये, बळीराम खंडाते, पांडुरंग घरजाडे व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते...
