सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक ने शिक्षणशास्त्र विभाग अंतर्गत पीएच.डी. पदवी (विद्यावारिधि-उपाधी) १६ एप्रिल २०२५ ला विश्वविद्यालयाच्या १३ व्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी व मुख्य अतिथी संस्कृत भारतीचे संस्थापक, भारतीय भाषा समिती, उच्च शिक्षा विभाग केंद्र सरकारचे अध्यक्ष पद्मश्री जमू कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते योगिता दिगांबर गायकवाड यांना नुकतीच पीएच. डी. (आचार्य पदवी) प्रदान करण्यात आली. शिक्षणशास्त्र विषयांतर्गत " महाराष्ट्र राज्यातील महिला सरपंच यांच्या शिक्षणाचा ग्रामविकासावर होणारा परिणाम -एक अभ्यास " या विषयावरील शोधप्रबंध शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख व मार्गदर्शक डॉ. हृषीकेश दलाई यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनात विश्वविद्यालयास सादर केला होता. राज्यस्तरावर संशोधन कार्य पूर्ण करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे संशोधन कार्यास सहकार्य मिळाले. प्रा. ललिता चंद्रात्रे जोशी ,अधिष्ठाता शिक्षणशास्त्र विभाग तथा संकीर्ण विद्याशाखा याचेही मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. प्रस्तुत संशोधन महाराष्ट्रातील सर्व सरपंच यांना ग्रामविकासाच्या दृष्टीने उत्कृष्ट कार्य करण्यासाठी मार्गदर्शक व उपयुक्त आहे. संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. श्रीनिवास वरखेडी, विश्वविद्यालयाचे प्राध्यापक प्रा. कीर्ती सदार, डॉ.राजश्री मेश्राम, डॉ अमोल मांडेकर, संशोधन कार्यात मार्गदर्शक डॉ हृषीकेश दलाई, प्रा. ललिता चंद्रात्रे यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले...
