उरणमध्ये प्रथमच महिलांना क्रिकेट स्पर्धेत प्राधान्य.
उरण दि २०(विठ्ठल ममताबादे )
उरण वाल्मिकी समाजाच्या वतीने (मोरा रोड सिद्धार्थ नगर) येथे प्रथमच मुली आणि महिला यांच्या साठी बॉक्स टाईप क्रिकेट चे सामने भरवण्यात आले या सामन्यात मोठ्या प्रमाणात मुली आणि महिला यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्त्री शक्तीचे प्रदर्शन केले...हे सामने भरवण्याच्या पाठीमागे मुलींच्या मनात या खेळाची आवड निर्माण झाली पाहिजे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते...या सामन्यात ६ संघांनी सहभाग घेतला... या स्पर्धेत अंतिम सामना पापा की परी विरोधात लगान या दोन संघात झाला... या अटीतटीच्या सामन्यात पापा की परी ने लगान या संघाचा पराभव करून अंतिम सामना आपल्या खिशात घातला...विजेता संघाला रोख रक्कम आणि ट्रॉफी पारितोषिक देण्यात आले.उपविजेत्या संघाला सुद्धा काही रोख रक्कम आणि ट्रॉफी पारितोषिक देण्यात आले...सर्व संघांना ट्रॉफी आणि खेळाडूंना मानचिन्ह पदक ( मेडल) देण्यात आले... ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वाल्मिकी समाजाचे मुरारी वाल्मिकी, प्रेमपाल वाल्मिकी, राजेंद्र गुदरिया,सुनील पारचा, सूरज वाल्मिकी, बंटी वाल्मीकि,समील पारचा, सुरेश शर्मा, पप्पू वाल्मिकी इत्यादी मित्र परिवार यांनी मेहनत घेऊन यशस्वी रित्या स्पर्धा पार पाडली... स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाल्याने वाल्मिकी समाजाच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले...जागृती पारचा यांनी आपल्या मनोगतातून महिला वर्गांना प्रथमच क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिली... महिलांना प्रोत्साहन दिले असे सांगत आयोजकांचे आभार मानले... सदर स्पर्धेला रसिक प्रेषक, जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला असल्याचे अध्यक्ष बंटी वाल्मीकि यांनी सांगितले...
