महाराष्ट्र वेदभुमी

उमेद अभियानाचा महिला बचत गटाचा भव्य महिला मेळावा

 


महिलांनी स्वतःचा व्यवसाय करुन यशस्वी उद्योजका व्हावे - सरपंच माया दमाहे

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- घरबसल्या स्वयंरोजगार उपलब्ध करून त्यांना अर्थाजनाचा नवीन मार्ग प्रदान करण्यासाठी नगरधन येथे दिनांक १८ मार्च रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

जगभरात ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखणीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार केला जातो. तमाम महिला वर्गाला त्यांच्या स्वातंत्र्याची जाणीव होण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो...

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महाराष्ट्र अंतर्गत सावित्रीबाई ग्रामसंघ व स्वागत ग्रामसंघ नगरधन यांच्या संयुक्त विद्यमाने व नगरधनच्या सी.आर.पी. सौ. सीमाताई बिरणवार यांच्या पुढाकाराने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रम ग्रामसंवाद भवन, जिल्हा परिषद शाळा, नगरधन येथे थाटात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरधनच्या सरपंच सौ. माया अरुण दमाहे व उमेद अभियानाचे तालुका व्यवस्थापक श्री. डोये सर (BMM पं.स. रामटेक) यांनी केले. कार्यक्रमात महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभाग नोंदवला. कार्यक्रमात १००० च्या वर महिला उपस्थित होत्या. उमेद अभियानातील महिला बचत गटातील उद्योग करीत असलेल्या महिलांचा व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सौ. आम्रपाली लोणारे व सौ. सीमा सुरेंद्र बिरनवार यांनी केले...

प्रामुख्याने वृषाली पडोळे (प्रभाग समन्वयक पं.स. रामटेक), अमोल मरस्कोल्हे (प्रभाग समन्वयक पं.स. रामटेक), अभिनव पुरानिक (वरिष्ठ प्रबंधक, युको बँक नगरधन), निग्रोध नारनवरे (वरिष्ठ लिपिक, युको बँक नगरधन), संजय बोरकर (वरिष्ठ लिपिक, युको बँक नगरधन), रश्मीताई काटीकर (समाजसेविका रामटेक), धनराज ठकरेले, प्रीतीताई राठोड, प्रियंका देव्हारे, कल्पना मेश्राम, मलका चोखाद्रे, आम्रपाली लोणारे, करुणाताई पौनिकर, कल्पना बावनकुळे, शर्मिला इनवाते, सुनंदा बिरनवार, बिंदुमती बिरनवार, ग्रा.पं. सदस्या, गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, व उमेद अभियानातील महिला बचत गटातील सर्व महिला उपस्थिती होत्या...

Post a Comment

Previous Post Next Post