श्याम लोखंडे रोहा रायगड :.कोलाड आंबेवाडी विभागातील श्री.आदिनाथ सेवा मंडळ व ग्रामस्थ मंडळ वरसगांव येथे महाशिवरात्री निमित्ताने २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत श्री सापया कृपेने ह.भ.प.गुरुवर्य ब्रम्हमूर्ती जगन्नाथ महाराज यांच्या कृपाशिर्वादाने अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायणाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने दररोज सकाळी काकड आरती, सकाळी तसेच दुपारी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण तसेच सायं. प्रवचन, त्यानंतर हरिपाठ, त्याचबरोबर रात्रौ हरिकिर्तन नंतर हरिजागरण असे आध्यात्मिक तथा धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे..
गेली ३२ वर्ष अविरतपणे या ग्रामस्थांच्या मदतीने चालत आलेला हा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असून या सप्ताहाच्या सांगता समारोह प्रसंगीच्या पूर्व संध्येला मंगळवारी विविध कार्यक्रमाबरोबरच दीपोत्सव साजरा करण्यात आला याचा भरभरून सांप्रदायिक मंडळींनी लाभ घेतला तसेच चैतन्य महाराज निंबोले नाशिक याच्या कीर्तनरूपी सेवेचा देखील उपस्थित श्रोते भक्त गणांनी श्रवण करत लाभ घेतला...
या धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमानिमित्ताने मंदिर परिसर सारे गाव कणा रांगोळी आणि रोषणाईने उजळून निघाले आहे.तर सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी अध्यक्ष अजित आंब्रुस्कर, उपाध्यक्ष प्रभाकर सानप, गणेश सानप, सेक्रेटरी रविंद्र मामलुस्कर, खजिनदार रामचंद्र आंब्रुस्कर,.मंगेश सानप, गणेश सानप, गणपत भालेकर, सहखजिनदार सहादेव कापसे, सचिन सानप, प्रतिक शिंदे, अमर मामलुस्कर, हिशोबतपासणीस तुकाराम सानप, अशोक लहाने, संजय राजिवले, रमेश सानप, राजेंद्र आंब्रुस्कर, सुशिल शिंदे, तसेच ग्रामस्थ मंडळ वरसगांव,श्री आदिनाथ सेवा मंडळ, श्री. सापया क्रिडा मंडळ व महिला मंडळ वरसगांव मेहनत घेत आहेत...
