मुलुंड प्रतीनीधी : सतिश वि.पाटील
दि. 01/03/2025 रोजी मुलुंड पोलीस ठाणे येथे 11.15 वा ते 14.05 वा. पर्यंत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले...
पोलीस ठाणेस दाखल व प्राप्त झालेल्या FIR, NC तसेच तक्रार अर्जातील एकूण 65 महिला/पुरुष तक्रारदार यांना पोलीस ठाणेस बोलाविण्यात आले होते... त्यापैकी एकुण 14 महिला व 22 पुरुष असे 36 तक्रारदार पोलीस ठाणेस हजर होते...
माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त मुलुंड विभाग, मा व.पो. नि. मुलुंड यांनी अर्जदारांच्या समस्याचे निराकरण केले.सायबर गुन्ह्यातील तक्रार निवारण
तसेच गुन्हातील 05 फिर्यादी यांचा मुद्देमाल परत देण्यात आला यामध्ये 1) एक टॅब 2) मोबाईल 3) रोख रक्कम 4) मोटारसायकल चावी दोन तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आली.. त्यांनी मुलुंड पोलिस ठाण्याचे व वरिष्ठांचे आभार व्यक्त केले... पत्रकार सतिश वि.पाटील तसेच अनेक मुलुंडकर या जनता दरबारात उस्फूर्त असे सहभागी झाले होते पोलीस कोणाचेही शत्रू व मित्र नसतात पण असेही एका नागरिकाने सायबर फसवणूक निवारण झालेल्या व्यक्तीने मत व्यक्त केले देश रक्षणासाठी बाॅर्डर वर सैनिक व जनतेसाठी पोलीस असा ही उल्लेख करण्यात आला..

