सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणविस तसेच राज्याचे मा. महसुल मंत्री तथा पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे व रामटेक विधानसभा क्षेत्राचे मा.आमदार तथा राज्यमंत्री श्री आशिषजी जयस्वाल यांचे निर्देशानुसार ७ कलमी कृती कार्यक्रमाचे अनुषंगाने १०० दिवसीय विशेष मोहिम अंतर्गत दि. १८ मार्च, २०२५ रोजी अप्पर तहसिल कार्यालय, देवलापार येथे समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीराचे मा. प्रियेश महाजन, उपविभागीय अधिकारी, रामटेक यांचे विशेष उपस्थितीत आयोजीत करण्यात आले. सदर शिबीरात मा. रमेश कोळपे, तहसिलदार, रामटेक, मा.श्रीमती पुनम कदम, अप्पर तहसिलदार, देवलापार यांचे व्यवस्थापनात सदर शिबीर यशस्वीरीत्या पार पाडले. सदर शिबीरामध्ये माजी जि.प. सदस्य श्रीमती शांताताई कुमरे व श्री हरिश उईके तसेच माजी सभापती पंचायत समिती, रामटेक श्री चंद्रकांत कोडवते व श्री संजय नेवारे इ. यांनी विशेष उपस्थिती दर्शविली होती. तसेच देवलापार मंडळातील श्रीमती सारीका उईके, सरपंच देवलापार, श्री रुपेश उइके, सरपंच डोंगरताल, सौ. कल्पना भलावी, सरपंच बांद्रा, श्री प्रविण उईके, सरपंच पिंपरीया, श्री रंजीत कोकोडे, सरपंच करवाही, श्री मुकेश दुबे, सरपंच वडांम्बा, सौ. वनिता टेकाम, सरपंच कट्टा, श्री विलास उईके, सरपंच लोधा, सौ. छाया भट्टी, सरपंच बोथीया पालोरा हे उपस्थित होते. अप्पर तहसिल कार्यालय, देवलापार अंतर्गत 9 ग्रामपंचायत अंतर्गत अदिवासी बहुल गावातील नागरीकानी उत्स्फुर्त प्रतिसाद देवुन शिबीराचा लाभ घेतला. सदर शिबीरामध्ये मा. श्री प्रियेशजी महाजन, उपविभागीय अधिकारी, रामटेक यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देवुन मार्गदर्शन केले व आदिवासी भागातील नागरिकांशी जनसंवाद करुन मुख्य अडचणी जाणुन घेतल्या त्यामुळे दुर्गम भागातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला... सदर शिबीरामध्ये तालुका रामटेक अंतर्गत सर्व विभागांकडून एकूण १७९८ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. महसुल विभागाअंतर्गत वनहक्क दावे, सेतु, आधार नोंदणी, निवडणुक ओळखपत्र, ७/१२ वाटप, फेरफार नोंदणी, सं.गा.यो., पुरवठा विभाग ई. अंतर्गत ४२४ लार्भार्थ्यांना लाभ देण्यात आला... तसेच वन विभागाअंतर्गत २० गुराखी यांना भोंगे वाटप, आरोग्य विभागामार्फत ९५७ पुरुष व महिला यांची आरोग्य तपासणी व आयुष्यमान कार्ड २० लाभ, पंचायत समीती मार्फत घरकुल योजनेअंतर्गत २३२ लाभ, कृषी विभागामार्फत २ ट्रॅक्टर वाटप तसेच इतर योजनांचे ६१ लाभ, उपअधिक्षक भुमी अभिलेख मार्फत २१ स्वामित्व प्रमाणपत्र, महावितरण मार्फत २ सौर ऊर्जा, महिला बाल विकास विभागामार्फत गरोदर महिला किट वाटप ५, लघु पाटबंधारे विभागामार्फत ५ लाभ, बँक आफ इंडिया मार्फत २५ लाभार्थी, पोस्ट पेमेंट बँक मार्फत २ लाभार्थी व इतर २२ लाभ देण्यात आले. एकूण सदर शिबीरात श्री जयसिंग जाधव, गटविकास अधिकारी, पंचायत समीती, रामटेक व महसुल विभागातील श्री भोजराज बडवाईक, नायब तहसिलदार, श्री मुकूंदा भुरे, नायब तहसिलदार संगायो, श्री संदेश हलमारे निरीक्षण अधिकारी व मंडळ अधिकारी, तलाठी व कार्यालयीन कर्मचारी व ईतर विभागातील अधिकारी व कर्मचारी या शिबिराकरिता उपस्थित होते...
