धनदांडगे, उद्योगपतींच्या बंगल्यांना मुसळधार पाणी... ग्रामस्थ पाण्यापासून वंचित असा भेदभाव का.?
अलिबाग (ओमकार नागावकर): अलिबाग तालुक्यातील रांजणखार-डावली हे गांव अलिबाग तालुक्यातील शेवटचे टोक असून गेले कित्येक वर्षे पाण्यापासून वंचित राहिले आहे... वारंवार प्रशासनाला निवेदने व प्रत्यक्ष भेटी देऊनही पाण्याचा प्रश्न अद्याप पर्यंत सुटलेला नाही व ही गावे पाण्यापासून आजपर्यंत वंचितच राहिली आहेत त्यासाठीच दि.०३ मार्च रोजी जिल्हाधिकार्यालय अलिबाग येथे ग्रामस्थांचा यांचे वतीने सर्व पक्षीय जन हंडा मोर्चा काढण्यात आला...
एम.आय.डी.सी. व्यतिरिक्त गावाला पाण्याचा इतर कोणताही स्रोत उपलब्ध नाही... या योजनोचे पाणी इतर गावातील धनदांडगे, उद्योगपती यांच्या बंगल्यांना देत असून ज्या गावांसाठी ही योजना राबवण्यात आली त्या गावांना मात्र पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे... सदरील गावात २० रुपये २० लि. प्रमाणे ग्रामस्थांना पाणी विकत घेऊन पाण्याची तहान भागवावी लागत आहे, मग सरकारच हर घर जल धोरण गेले कुठे?..असा सवाल करत रांजणखार-डावली ग्रामस्थांचे उग्र आंदोलन करण्यात आले...

