श्रीवर्धन प्रतिनिधी:युवा प्रतिष्ठान रायगड ही संस्था 2022 पासून सक्रिय असून संस्थे मार्फत सामाजिक कार्य राबवत असतें...याच सामाजिक कार्याचे कर्तव्य बजावत दि 30/3/2025 युवा प्रतिष्ठान रायगडसामाजिक शैक्षणिक आरोग्य कला क्रीडा यांनी श्रीवर्धन तालुक्यातील गुळधे गावचे रहिवाशी श्री सुधाकर हरिभाऊ हुमणे यांची कन्या कु. श्रावणी सुधाकर हुमणे डॉक्टर झाल्या बद्दल युवा प्रतिष्ठान रायगडच्या वतीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन तिचा सत्कार केला.. तसेच तिच्या पुढील वाटचालीस संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या...
यावेळी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक स्वतः श्री अमर खेरटकर व सहसंपर्क प्रमुख श्री संजय कोमनाक व सहकारी सदस्य श्री सिद्देश महाडिक साहेब हे उपस्थित होते...
