सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- भारतात एककाळ असा होता जेव्हा मुलींचा जन्म होण्याआधीच त्यांना मारले जायचे. कारण, घरात मुलगी जन्मली म्हणजे खर्च वाढला, तिचे लग्न हुंडा यामुळे मुलगी नकोशी होती... पण, कालांतराने हि परिस्थिती बदलली आणि देशात मुलींची संख्या वाढलीय...'बेटी बचाओ बेटी पढाओ' हे अभियान मोदी सरकारने २२ जानेवारी २०१५ रोजी सुरू केले होते... या योजनेअंतर्गत समाजात मुलींसोबत केलेली नकारात्मक वागणूकला आळा घालण्यासाठी सोबतच या विषयी जागरुक करण्यासाठी आणि मुलींच्या करीअर आणि भविष्याला उज्वल करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते... या योजनेअंतर्गत सरकारने मुलींच्या कल्याणासाठी अनेक योजना आणल्या आहेत... रामटेक उपविभागीय पोलीस, विभागाच्या वतीने आज (३ मार्च) ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या महत्वपूर्ण उपक्रमाअंतर्गत जनजागृती रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले... मा. पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली... गेल्या १० वर्षांपासून महिलांच्या संरक्षण व शिक्षणाच्या प्रसारासाठी हा उपक्रम संपूर्ण देशभर राबवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर, महिला व बालविकास विभागाने सर्व शासकीय कार्यालयांना या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत... त्यानुसार, रामटेक येथे या रॅलीचे आयोजन करण्यात आले... या रॅलीत पोलीस स्टेशन पारशिवनी, रामटेक, अरोली आणि देवलापार येथील महिला पोलीस कर्मचारी, महिला पोलीस पाटील, महिला समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला... महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी आणि त्यांना शिक्षण व न्याय मिळावा, यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे... महिलांना तक्रार नोंदवण्यासाठी अनेक ठिकाणी फिरावे लागू नये म्हणून ‘वन स्टॉप सेंटर’ या विशेष उपक्रमाची सुरुवात उपविभाग रामटेक येथे करण्यात आली आहे... या सेंटरमध्ये महिलांना वकील, डॉक्टर आणि पोलिसांची मदत एकाच ठिकाणी मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचा वेळ वाचेल आणि त्यांना त्वरित न्याय मिळेल... रॅलीची सुरुवात उपविभागीय पोलीस कार्यालय, रामटेक परिसरातून मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप पोलीस स्टेशन, रामटेक येथे करण्यात आला... घोषणांनी परिसर दणाणून गेला, तर नागरिकांनीही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला... महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या हक्कांसाठी रामटेक पोलीस विभागाने घेतलेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी आणि स्तुत्य आहे...
