मुलुंड प्रतिनीधी : सतिश वि.पाटील
आजकालची तरुण पिढी मैदानी खेळांऐवजी फक्त मोबाईलमध्येच व्यस्त असते... त्यातच, अनेक मोकळी मैदाने पार्किंगसाठी वापरली जातात... हे लक्षात घेऊन, सागर देवदान यांनी पुढाकार घेतला आणि स्थानिक रहिवासी वायाळ कुटुंब व मित्रांच्या मदतीने, लहान-मोठ्यांसाठी शनिवार आणि रविवारी नाहूर गावठन येथे मोफत क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले... या स्पर्धेत १४ संघांनी भाग घेतला...
विजेता, उपविजेता, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, मालिकावीर आणि खेळपट्टी तयार करणाऱ्या व्यक्तीला विशेष सन्मान यांसारखी अनेक पारितोषिके देण्यात आली...
या क्रिकेट सामन्यांमुळे नाहूर गावठाण परिसरातील सर्वजण एकत्र आले, मैदानातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि शिवशक्तीचे मैदान पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झाले.प्रमुख पाहुणे श्री.जगदीश शेट्टी आणि पत्रकार: सतिश वि.पाटील यांची उपस्थिती त्यांचा मंडळाकडून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मान्यवरांकडून नाणे उडवून सामन्याचा सुभारंभ व क्रिकेट मैदानावर दोन चेंडू ट्रायलचे खेळून सुरुवात करण्यात आली...
