महाराष्ट्र वेदभुमी

किहीम येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबीर संपन्न


शिबिराचा अनेक ग्रामस्थांनी घेतला लाभ

सोगाव - अब्दुल सोगावकर: अलिबाग तालुक्यातील किहीम येथील राजिप शाळेत ग्रुप ग्रामपंचायत किहीम व जे.एस.डब्ल्यू. फाउंडेशन, डोलवी तसेच संजीवनी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते ४:३० वा. यादरम्यान मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते.

          या शिबिराचे उद्घाटन किहीम सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्या हस्ते व उपसरपंच मिलिंद पडवळ,  ग्रामपंचायत कर्मचारी, किहीम पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी उपस्थित संजीवनी हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, परिचारिका, औषधे वाटप तज्ञ व त्यांचे इतर सहकारी यांचे किहीम सरपंच व उपसरपंच यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी सर्व स्तरातील महिला व पुरुष ग्रामस्थांची विविध आजारांवर तपासणी व मार्गदर्शन करून त्यांना औषधे दिली, तसेच तपासणीमध्ये इतर आजारांची लक्षणे असलेल्या रुग्णांना संजीवनी हॉस्पिटल, वडखळ येथे उपचारासाठी येण्यास सांगितले. त्या रुग्णांवर संजीवनी हॉस्पिटलमध्ये मोफत अथवा सवलतीच्या दरात उपचार करण्यात येतील, असे डॉक्टरांनी रुग्णांना सांगितले. सदर आरोग्य शिबिराचा किहीम पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला, तसेच शिबीर यशस्वी होण्यासाठी किहीम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली...

फोटो लाईन : किहीम येथे   मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबिरावेळी उपस्थित किहीम सरपंच पिंट्या गायकवाड, उपसरपंच मिलिंद पडवळ व इतर उपस्थित मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post