प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा : मराठी भाषा ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. तिचा समृद्ध , संपन्न वारसा आणि साहित्य प्रेम यामुळे २७ फेब्रुवारी हा दिवस " मराठी भाषा दिन " म्हणून साजरा केला जातो. मराठीतील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा हा जन्मदिवस आहे...
जिल्हा परिषद केन्द्रशाळा न्हावे मराठी येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रथम परिपाठाच्या वेळेस मराठी भाषेचे महत्त्व व माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांनी माय मराठी , माझी शाळा , माझी आई ह्या कविता गाऊन साजर केल्या . तसेच मराठी भाषा गौरव गीत " सांगे ही शैला आई बापाला , नाव माझे शाळेत दाखल करा , जाते मी मराठी शाळेला " ही गीते अतिशय सुंदर रितीने साजर केली . तसेच अभंग , कोळीगीत , लावणी , शेतकरी गीत आशा विविध गीतांवर अप्रतिम नृत्य सादर केले . व बाळ्या डान्स शिक्षणावरील गीत गाऊन सादर केला. तसेच निबंध , चित्रकला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या वेशभूषा परिधान केलेले पहायला मिळाले. एकदरीत संपूर्ण दिवसच शाळेत मराठमोळ्या व उत्साहात साजरा करण्यात आला...
कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या विषय शिक्षीका पाबरेकर व फारुकी यांनी केले. सदर कार्यक्रमाचे केंद्रप्रमुख पाबरेकर यांनी कौतुक केले .मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा लक्षात घेऊन मराठीची जास्तीत जास्त गोडी विद्यार्थ्यांच्या मनात कशी निर्माण होईल याकडे विशेष प्रयत्न करत असलेली शाळा या निम्मिताने दिसून आली...
