महाराष्ट्र वेदभुमी

गंभीर जखमी बिबट्याचा उपचारार्थ नेतांना मृत्यु

अज्ञात वाहनाने बिबट्याला उडविले 

राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वरील घटना

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- वनविभागाच्या हद्दीतील रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या कांद्री मनसर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गा वर घडली.... एक नर बिबट्या, वय अंदाजे ५ ते ६ वर्षे, अज्ञात वाहनाच्या धडकेचा शिकार झाला... जखमी अवस्थेत तो महामार्गाच्या कडेला पडला होता... घटनास्थळ पेंच व्याघ्र प्रकल्पाला लागूनच आहे... त्यामुळे महामार्ग ओलांडून पलीकडे जात असतांना बिबट्याचा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे... महामार्ग ओलांडत असतांना अज्ञात वाहनाने बिबट्याच्या जबर धडक दिली... याबाबत माहिती मिळताच रामटेक वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत व वनकर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले... व त्यांनी तातडीने बिबट्याला गरजू उपचारासाठी नागपूर येथे नेण्याची व्यवस्था केली... मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला...

वरीष्ठ अधिकारी श्री. प्रभुनाथ शुक्ल उपवनसंरक्षक नागपूर, श्री. आर एम घाडगे एसीएफ रामटेक यांना माहिती देण्यात आली... मृत बिबट्याला अंबाळा नर्सरी, रामटेक येथे नेण्यात आले... तेथे एनटीसीएच्या मार्गदर्शनानुसार उत्तरीय तपासणी करण्यात आली...

   यावेळी एसीएफ श्री. आर एम घाडगे, वनपरीक्षेत्र अधिकारी रामटेक श्री. अनिल भगत, श्री. अविनाश लोंढे मानद वन्यजीव रक्षक, श्री. मिलिंद पंचभाई एनटीसीए प्रतिनिधी, श्री. एम. एल. गोडीमेश्राम क्षेत्रसहायक मनसर, श्री. बी. एन. गोमासे क्षेत्रसहायक, कु. दिपाली नाहे वनरक्षक, श्री. योगेश अंबाझीरे वनरक्षक, श्री. श्रावण अडमाची वनरक्षक, डॉ. बबीता मेश्राम, डॉ. पूजा जंगले आणि डॉ. राजेश कूलसुंगे हे पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थीत होते... यावेळी बिबट्याचे दहन करण्यात आले... अज्ञात वाहनाविरोधात वनविभागाने वन्यजीव (संरक्षण ) कायदा १९७२ च्या कलम ३९, ९ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रामटेकचे वनपरीक्षेत्र अधिकारी ए. बी. भगत हे करीत आहेत...

वनप्राण्याचे जतन

एकीकडे वन्यप्राण्याचं जतन करण्याकरता प्रयत्न होताहेत तर दुसरीकडे वन्यविभाग कुठलीही काळजी घेत नसल्याचं बिबट्याच्या मृत्यूवरून दिसून येत आहे. नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर आतापर्यंत अनेक बिबटयाचा अपघातात अंत झाला आहे. तेव्हा वनविभागाने त्याच्या क्षेत्रात पानपठे तयार करणे तसंच रस्ते ओलांडून वाघ, बिबट व अन्य प्राणी येऊ नये यासाठी सुरुक्षा भिंत किंवा जाळ्या लावणे गरजेचे आहे. तेव्हाच प्राण्याचे अपघात व पर्यायाने मृत्यू थांबतील...

Post a Comment

Previous Post Next Post