महाराष्ट्र वेदभुमी

फळझाडांच्या लागवडीतून वृक्षारोपणाचा संदेश

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- बॅजेल प्रा. लिमी. नागपूर व गट ग्राम पंचायत, राष्ट्रीय हरित सेना नवेगाव खैरी यांचे संयुक्त विद्यमाने नेऊरवाडा येथे पेन्शन नदीच्या किनाऱ्यावर थोडा झाडांची लागवड करून वृक्ष संरक्षण व संवर्धनाचा कृतिशील संदेश देण्यात आला. यामध्ये आंबा ,फणस, निंबू, पेरू, चिकू, सीताफळ या प्रजातींच्या दोनशे रोपांची लागवड करण्यात आली. सरपंच फजितराव सहारे, व माजी उपसभापती चेतन देशमुख, आकाशझेपचे सचिव व आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे, बॅजेल प्रा. लिमीचे कैलाश देशमुख यांनी वृक्षांचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. इको क्लबचे निसर्गदूत वैभव सहारे व सेजल कळमकर यांनी वृक्ष आणि मानवी जीवन यांच्यातील सहसंबंध याबाबत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन आकाशझेपचे अध्यक्ष प्रा. अरविंद दुनेदार यांनी केले... 

बॅजेल प्रा. लिमीचे सागर कडू, आकाश बोगा, शुभम नारनावरे, राहुल खडसे, प्रफुल नांदेकर, कौस्तुभ दामले, किरण नंदनवार, पेंच व्याघ्र प्रकल्प परिसरातील शिक्षक ज्ञानोबा पाटील, अतुल कराड, अंकुश शेवत्रे, गणेश जाधव, प्रवीण जाधव, योगेश बाविसकर, हर्षद लोंढे, गणेश शेळके, संजय लोखंडे हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गट ग्रामपंचायत नवेगाव खैरीचे सुभाष दुपारे, अनिकेत चाफळेव कर्मचारी, इको क्लबच्या भुवनेश्वरी शेंडे, वंशिका सावरकर, प्रतीक्षा वारकर, खुशी खंडाळे आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले...

Post a Comment

Previous Post Next Post