कोलाड (श्याम लोखंडे) : श्री.आदिनाथ सेवा मंडळ व ग्रामस्थ मंडळ वरसगांव येथे महाशिवरात्री निमित्ताने बुधवार दि. २६/२/२०२५ ते ५/३/२०२५पर्यंत श्री सापया कृपेने ह.भ.प.गुरुवर्य ब्रम्हमूर्ती जगन्नाथ महाराज यांच्या कृपाशिर्वादाने अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायणाचे आयोजन करण्यात येणार आहे...
धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमानिमित्ताने दररोज सकाळी ४ ते ६ वा. काकड आरती, सकाळी ८ ते १० दुपारी ३ ते ५वा. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण तसेच सायं. ५ ते ६ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ वा किर्तन नंतर हरिजागरण तसेच बुधवार दि. ५/३/२०२५ रोजी सायं ४ ते ८ वा. पालखी सोहळा होणार आहे...
सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी अध्यक्ष अजित आंब्रुस्कर, उपाध्यक्ष प्रभाकर सानप, गणेश सानप, सेक्रेटरी रविंद्र मामलुस्कर, खजिनदार रामचंद्र आंब्रुस्कर, मंगेश सानप, गणेश सानप, गणपत भालेकर, सहखजिनदार सहादेव कापसे, सचिन सानप, प्रतिक शिंदे, अमर मामलुस्कर, हिशोब तपासणीस तुकाराम सानप, अशोक लहाने, संजय राजिवले , रमेश सानप, राजेंद्र आंब्रुस्कर, सुशिल शिंदे, तसेच ग्रामस्थ मंडळ वरसगांव,श्री आदिनाथ सेवा मंडळ,श्री. सापया क्रिडा मंडळ व महिला मंडळ वरसगांव मेहनत घेत आहेत...
