श्रीवर्धन विशेष प्रतिनिधी : रविवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ युवा प्रतिष्ठान रायगड संस्थेच्या वतीने भव्य टि शर्ट अनावरण सोहळा कार्यक्रमाच आयोजित करण्यात आला.... कार्यक्रमाचे विद्यमान अध्यक्ष श्री. गणेश निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवसेना उबाठा पक्षाचे श्रीवर्धन तालुका संपर्क प्रमुख श्री. योगेश गायगर, आम्ही गिरगावंकर संस्थापक श्री. गौरव सागवेकर, कोकण युवा सेवा संस्थेचे संस्थापक श्री. अभि कोटकर,महाराष्ट्र नवनिर्माण सेना श्रीवर्धन तालुका सोशल मीडिया प्रमुख श्री. सुनील रिकामे, मेघरे विभाग १६ गाव कुणबी समाजाचे माजी सेक्रेटरी श्री. सतीश शिर्के, गालसुरे विभाग कुणबी समाजाचे मुंबई उपाध्यक्ष श्री. मयुरजी गजमल यांच्या प्रमुख उपस्थितीत युवा प्रतिष्ठान रायगडच्या वतीने आयोजित केलेल्या टि शर्ट चे अनावरण करण्यात आले... कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी तसेच प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी आपले बहुमोल मार्गदर्शन करून मनोगत व्यक्त केले,..
प्रतिष्ठानचे संस्थापक श्री.अमर खेरटकर,मनोहर जाधव(अध्यक्ष),गणेशशिंदे(उपाध्यक्ष),प्रदीप चोरगे(सहचिटणीस),संतोष जाधव (प्रभारी सचिव), मयूर शिगवण (संघटक प्रमुख),संपर्क प्रमुख मुंबई श्री सचिन जाधव, सहसंपर्क प्रमुख मुंबई श्री संजय कोमनाक व सर्व सहकारी सदस्य नितेश बोर्ले, विशाल सावंत, अभय तिलटकर, प्रशांत जाधव, प्रफुल तिलटकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे तसेच श्रोत्यांचे कार्यक्रमाला उपस्थित यांचे आंगरेवाडी हिंदू मराठी शाळा वी.पी .रोड गिरगावबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने सर्वांचे आभार मानून आनंद व्यक्त केला..
सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीने आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी व माता बंधू भगिनींच्या साक्षीने कार्यक्रम संपन्न झाला...
