महाराष्ट्र वेदभुमी

हर्ष पाटील युवकांचे दमदार नेतृत्व यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा संपन्न

 


दिग्गज  नेत्यांची उपस्थिती तर स्पर्धेला प्रेक्षकांचे अलोट गर्द

प्रतिनिधी :- सत्यप्रसाद आडाव चणेरा

     युवा कबड्डीपटू ना एक प्लॅटफॉर्म मिळावा त्यांना खेळण्याची संधी मिळाली या उद्देशाने रोहा तालुक्यातील युवकांचे दानशूर व्यक्तिमत्व असलेले युवा हर्ष पाटील यांनी वाढदिवसाच्या औचित्य साधून जिल्हास्तरीय भव्यदिव्य ५० किलो वजनी गटाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.. जिल्ह्यातील नामवंत ४८ संघाने सहभाग नोंदवला... तर स्पर्धेला अलोट गर्दी होती अशा आनंदी वातावरणात ही स्पर्धा यशस्वी हर्ष पाटील  युवा प्रतिष्ठान मंडळाने संपन्न केली...स्पर्धेचे प्रमुख पाहुणे रोहा तालुका भाजपा अध्यक्ष अमित घाग यांची प्रमुख उपस्थिती लाभली...त्यांच्या समवेत स्वराज्याचे संस्थापक रोशन चाफेकर,हाजी कोठारी व विविध सामाजिक क्षेत्रातील कला, क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या स्पर्धेला सदस्य भेट दिली... 


  हर्ष पाटील गेली अनेक वर्षापासून युवांना प्राधान्य मिळावे या उद्दिष्टाने सातत्यपूर्ण कबड्डी स्पर्धेचे आयोजन करीत आहे... स्पर्धेचे उद्घाटन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा अध्यक्ष अमित घाग यांनी श्रीफळ फोडले.... तर हर्ष पाटील यांचा सपोर्ट सिस्टीम अतुल पाटील यांनी स्पर्धेसाठी मेहनत घेतली...स्पर्धेतील सर्व सामने चुरशीचे व प्रेक्षणीय ठरले...अंतिम सामना बहिरेश्वर शिव विरुद्ध हर्ष पाटील युवा प्रतिष्ठान या दोन उदय संघामध्ये अंतिम लढत झाली.... यामध्ये बहिरेश्वर शिव संघाने पकड्डी लढायांचा नमुना पेश करीत प्रथम क्रमांक पटकाविला...तर द्वितीय क्रमांक हर्ष पाटील युवा प्रतिष्ठान,तृतीय क्रमांक ढेपेवाडी,चतुर्थ क्रमांक हर्ष शिवा प्रतिष्ठान संघाने पटकाविला.... या सर्व संघांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले...पब्लिक हिरो हर्ष पाटील, मालिकावीर अविनाश पाटील उत्कृष्ट पकड मनोज मेंगाळ,उत्कृष्ट चढाई तेजस परडी ह्या सर्व खेळाडूंना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले...

Post a Comment

Previous Post Next Post