महाराष्ट्र वेदभुमी

ज्ञानदेव पोवार यांच्या उपस्थितीत शुभेच्छा सत्कार ; कृतज्ञता उत्सहात संपन्न.

 

माणगाव :- (नरेश पाटील) : शहरातील वॉर्ड क्र. 16 खांदाड येतील नामांकित एकता मित्र मंडळ तर्फे नुकताच शुभेच्छा, सत्कार आणी कृतज्ञता असा एक अनोखा त्रिवेनी संगम उपक्रम गुरुवारी दि. 02 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी माजी लोकप्रिय नगराध्यक्ष तथा याच वॉर्डातील  विद्यमान नगरसेवक मा. ज्ञानदेव पोवार यांच्या विशेष उपस्थितीत हाती घेण्यात आला होता... यावेळी एकता मित्र मंडळाचे सन 2025 वर्षा करीता नव्याने निवड झालेल्या पदाधिकारी सह अनेक सदस्य उपस्थित होते... दरम्यानाचा काळात सदर नूतन पदाधिकारी यांची निवड 2024 सर्त्या वर्षाचे तीन दिवस आगोदर म्हणजेच रविवारी दि. 29 डिसेंबर रोजी आयोजित सभा दरम्यान नवीन पदाधिकारी सह ईतर विषय होऊन त्यात मंडळाचे सक्रिय सदस्य असलेल्या सुनील धुमाळ यांना प्रभारी अध्यक्ष म्हणुन निवडण्यात आली आणी ईतर पदाकरिता ही सर्वांनुमताने सदस्य यांची निवड झाले होते... 

या दरम्यान नव्या वर्षाचे पहिलाच दिवस दि. 01-01-2025 रोजी मंडळातील व्यक्तीमत्व सदस्य अजित पवार यानी आपला 50 वा वाढदिवस साजरा केला... या औचित्य साधून एकता मित्र मंडळाचे अनेक सदस्य यानी दुसरा दिवस दि. 02 जानेवरी 2025 रोजी रात्री 08 वाजता अजित पवार यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी जमले होते तर या शुभेच्छा सोहळ्यासाठी ज्ञानदेव पोवार यांना खास निमंत्रित करुन वाढदिवसाच्या सत्कार मुर्थी अजित पवार यांना 50 वा वाढदिवसाच्या खास शुभेच्छा पर पुष्प गुच्छ ज्ञानदेव पोवार यांच्या अमूल्य हसतेनी देवून शानदार येतोचित सत्कार करण्यात आला.. यावेळी एकता मित्र मंडळचे नव्याने प्रभारी म्हणुन अध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या सुनील धुमाळ यांचेही सत्कार तसेच भावी काळाचे वाटचालसाठी त्याच बरोबरीने याच मंडळाचे मावळते अध्यक्ष निर्णय सर यांचे कृतज्ञता पर त्यांचे ही सत्कार मा. पोवार साहेब यांच्या हसतेनी पुष्प गुच्छ देवून करण्यात आले.. अंती कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. निर्णय सर यानी करुन सांगता केले...

Post a Comment

Previous Post Next Post