महाराष्ट्र वेदभुमी

लोकनेते दि.बा.पाटील साहेब यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

 

मुलुंड प्रतिनीधी : सतिश वि.पाटील:  लोकनेते दि बा पाटील साहेब यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त श्री देवस्थान संस्था घणसोली ,आणि लो .दि बा पाटील विमानतळ नामकरण कृती समिती मार्फत रक्तदान शिबीर आयोजित केले.. 

महाराष्ट्र राज्य वन मंत्री सन्माननीय श्री गणेश नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली... सुमारे ३७ जणांनी रक्तदान करून लोकनेते दि बा पाटील साहेब यांच्या संघर्षमय कार्यकाळाला मानवंदना दिली..याप्रसंगी मा नगरसेवक उत्तम म्हात्रे, नगरसेवक घनःश्याम मढवी, नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, गावकी अध्यक्ष सीताराम मढवी , सरचिटणीस मंगेश म्हात्रे , श्री.सतिश वि. पाटील पत्रकार, घणसोली  ग्रामस्थ, २९ गाव संघर्ष समितीचे सर्व कार्यकर्ते, मुंबई , नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणात दि बा समर्थकांनी उपस्थितीत राहून लोकनेते दि बा पाटील साहेबांच्या लढाऊ, झुंझार व्यक्तिमत्वाच्या आठवणींना उजाळा दिला.. असा प्रामाणिक व सर्वसामान्य,निस्वार्थ लोकनेता होणे नाही...

Post a Comment

Previous Post Next Post