विशेष प्रतिनिधी (रोहा) : रोहा तसेच धाटाव औद्योगिक क्षेत्रामधील अनेक छोटे मोठे कारखाने व कंपन्या यांच्यामध्ये बनत असलेले खाद्यपदार्थ तसेच अनेक वापरातील वस्तू सतत बनत असतात अशा या बनत असलेल्या ठिकाणी कंपन्यांमध्ये कबुतरांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे या वाढत्या कबुतरांच्या संख्येमुळे तेथे काम करणाऱ्या व्यक्तींना कबुतरांच्या विष्ठे पासून त्रास होऊ शकतो तसेच बनवलेल्या खाद्यपदार्थ किंवा अनेक वापरातील वस्तूंमध्ये ही विष्ठा जाऊ शकते तसेच विष्ठा करू ही शकतात हे नाकारू शकत नाही कारण काही कंपन्या त्यांचा बंदोबस्त जाणून बुजून खर्च अभावी करत नाही परंतु त्याचा त्रास मात्र कामगार वर्गाला तसेच कंपनीच्या गुणवत्तेवर ओडवला जाऊ शकतो....कबुतराच्या विष्ठेशी संबंधित असलेले मानवी रोग: हिस्टोप्लाज्मोसिस, क्रिप्टोकोकोसिस, सिटाकोसिस आणि टॉक्सोप्लाज्मोसिस. इ.
तसेच अनेक बिल्डिंग्स वर बिल्डिंग मध्ये लावलेल्या AC वर खिडकी व गॅलरी मध्ये घरटे बांधून तेथेच विष्ठा केली जाते तसेच गावागावात घरा घरा मध्ये कबूतर पालले जातात कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कबुतरांच्या वावरामुळे फुप्फुसांचे गंभीर आजार बळावत आहेत...काहीवेळा तर फुप्फुस कायमचे निकामी होण्याची वेळ येऊ शकते या अशा रुग्णांना 'लंग्स फायब्रोसिस'सारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागू शकते..
तसेच त्याच्यातून कबुतरे उडताना त्यांच्या पिसांमधून आणि वाळलेल्या विष्ठेमधून बाहेर पडलेले सूक्ष्म कण फुप्फुसात गेल्याने विविध प्रकारच्या श्वसनविकारांना सामोरे जावे लागू शकते...
लंग्स फायब्रोसिस म्हणजे हा फुप्फुसाचा एक गंभीर आजार असून, तो श्वसनप्रणालीवर परिणाम करतो... हा आजार असलेल्या रुग्णास चालताना मोठ्या प्रमाणात दम लागतो... अशा रुग्णांना काही वेळेस कृत्रिमरीत्या ऑक्सिजन देण्याची वेळ येते... त्यामुळे याचा परिणाम दैनंदिन कामावर होत असतो, असे श्वसनविकार तज्ज्ञांनी कडून सांगितले गेले आहे...
विष्ठेतील बुरशी, जिवाणू ठरतात घातक!
कबुतरांना अनेकदा खायला देऊ नये. कबुतरखाने बंद करावेत, अशी मागणी नागरिक करतात. कबुतरखान्याच्या परिसरातील नागरिकांना श्वसनविकाराचा आजार होतो. कबुतरांच्या विष्ठेत बुरशी, जिवाणू असतात. त्यामुळे त्यांच्या विष्ठेतून झालेल्या संसर्गामुळे श्वसनविकार वाढतो. खोकला डोकेदुखी पोट दुखणे ताप येणे असे अनेक आजार होऊ शकतात रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना फुप्फुसाचा त्रास बळावतो. त्याचे रूपांतर लंग्स फायब्रोसिसमध्ये होण्याची शक्यता असते. श्वसनाचा काही विकार झाल्यास तत्काळ डॉक्टरांकडून वेळीच उपचार घ्यावेत..
