महाराष्ट्र वेदभुमी

नोकरी राहणार की जाणार? राज्यातील लाखांहून अधिक सुरक्षारक्षकांच्या डोक्यावर टांगती तलवार


आम्ही काय करायचं ? कुंटूब जगवायचं कसं ?अडीचशे सुरक्षा रक्षकांच्या नोकरीचा प्रश्न ऐरणीवर

विज वितरण उपकेंद्रातील सुरक्षा रक्षकांचे कामगार मंत्री जयस्वाल यांना निवेदन

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- महाराष्ट्र राज्यातील सुरक्षारक्षक मंडळाच्या एक लाखाहून अधिक सुरक्षारक्षकांच्या डोक्यावर सध्या नोकरी टिकणार की नाही याची टांगती तलवार आहे... बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा वीजकंपनीच्या खासगीकरणाचा घाट राज्यातील नव्या सरकारने घातला आहे... ३२९ उपकेंद्रे खासगी कंत्राटदारांच्या घशात घालून ती खासगी ठेकेदारांना चालविण्यास देण्याचा नवा 'डाव' सरकारच्या माध्यमातून खेळला जात असून त्याच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या उपकेंद्रात तिन पाळीमध्ये कार्यरत तिन सुरक्षा रक्षकापैकी दोन सुरक्षा रक्षकांचे काम बंद करण्यात येणार असुन फक्त रात्रपाळीसाठी एकच सुरक्षा रक्षक हा कंत्राटदार ठेवणार असल्याची खंत सुरक्षा रक्षकांनी यावेळी व्यक्त केली... तेव्हा उर्वरीत सुरक्षा रक्षकांचा व त्यांच्या परीवाराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असुन चाळीस ते पन्नास वयोगटातील आम्ही सुरक्षा रक्षक या वयात कुठे नोकरी मागायला व करायला जाऊ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला... यासंबंधीचे एक निवेदन नुकतेच कामगार मंत्री आशिष जयस्वाल यांना सुरक्षारक्षकांच्या संघटनेने दिले...

महावितरण विद्युत कंपनीत अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासन स्थापित जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील हजारो सुरक्षा रक्षक संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहे. अत्यंत अल्प प्रमाणात मिळणाऱ्या वेतनात आपले कर्तव्ये पार पाडून सुद्धा शासनाने तसेच महावितरण कंपनीने कार्यरत सुरक्षा रक्षक यांची उपासमारीची वेळ निश्चित केली आहे... सुरक्षा रक्षक यांचासमोर आजच्या महागा महाराष्ट्रातील गोरगरीब, शोषित, पिडीत आणि वंचित सुरक्षा रक्षक यांचा रोजगाराचा विचार करून महावितरण कंपनीचे ३२९ विद्युत उपकेंद्राचे खाजगीकरण तात्काळ रद्द करावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेचा वतीने खाजगीकरणाच्या जाहीर निषेधार्थ धरणे,उपोषण तसेच आंदोलन पुकारण्यात येईल असे त्यांनी निवेदनातुन मंत्री महोदयांना म्हटले आहे...

सुरक्षा रक्षकांच्या प्रमुख मागण्या

१) उपकेंद्राचे खाजगीकरण झाले तरी सर्व सुरक्षा रक्षक महाराष्ट्र शासन स्थापित मंडळाचे राहील...

२) तिन्ही पाळीतील (२४ x ७) याप्रमाणे सुरक्षा रक्षक नियमित कार्यरत राहतील...

३) सदर खाजगी कंपनीला शासन तसेच मंडळाचे नियमानुसार वेतन, वेतनवाढ, तरतुदी, कामाचे तास, इतर सर्व बाबी कंपनीला अदा करणे बंधन कारक राहतील...

मुख्यमंत्री यांना सुरक्षा संघटनेचे पत्र

सुरक्षा रक्षक संघटनेने ना. आशिष जयस्वाल यांना निवेदन देत त्यांची नोकरी वाचविण्याची विनंती केली असता ना. जयस्वाल यांनी त्वरीत दखल घेत याबाबद त्यांनी त्वरीत मुख्यमंत्री फडणविस यांचे नावाने एक पत्र तयार करायला लावले व ते पत्र मुख्यमंत्री फडणविस यांना देणार असल्याचे सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post