महाराष्ट्र वेदभुमी

शेतीच्या पांदन रस्त्याला मिळणार क्रमांक



सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :-  ग्रामीण भागातील शेतरस्त्यांचा प्रश्न आजही कायम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पायी जाणे देखील मुश्किल होत आहे... शिवाय काळाच्या ओघात शेती व्यवसयात प्रगती होत असताना केवळ रस्ते नसल्यामुळे बागायत क्षेत्र हे वाढत नाही... कारण वाहने येण्याचीच सोय नसते...

अनेक पांदन रस्ते हे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत...अनेक शेतकऱ्यांना त्यामुळे शेतात वाहतुक करण्यासाठी संघर्ष करावा लागतो... शेतकरी तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल करतात... तहसील कार्यालयात तक्रारीचा ढिग तयार होते....पण समस्या सुटत नाही... यावर तोडगा काढण्यासाठी(दि.१६) ला मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली... यावेळी राज्यमंत्री ॲड.आशिष जैस्वाल, आमदार अभिमन्यु पवार, महसुल विभागाचे अप्पर मुख्य सचिव, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव व इतर विभागाचे सबंधित अधिकारी उपस्थित होते...

      या बैठकीत राज्यातील सर्व शेत/पांदन रस्त्यांना ग्रामीण व इतर जिल्हा मार्गाप्रमाणे क्रमांक देण्याबाबत निर्णय करण्यात आला आहे... बळीराजा शेत/पांदन रस्ते योजना कार्यान्वित करण्याबाबत व ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे, असे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी तहसीलदार यांनी ज्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे, त्या शेतकऱ्यांची बैठक घेवून अतिक्रमण दूर करण्याबाबत सुचित करण्यात यावे व अतिक्रमणधारक शेतकरी अतिक्रमण काढण्यास तयार नसेल तर, महसूल नियमावलीचा अवलंब करून अतिक्रमणमुक्त करण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा विविध महत्वाच्या उपाययोजना करण्यासंदर्भात संबंधित अधिकारी यांना निर्देश देण्यात आले...

Post a Comment

Previous Post Next Post