कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथे विजेचा शॉक लागून एका कंत्राटी कामगार तरुणाचा अंत झाल्याची घटना घडली असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे...तर माणगाव तालुक्यातील घोटवळ येथील तरुण योगेश मारुती फराडे वय वर्षे ३८ याचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे...
कोलाड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहिती नुसार मंगळवार दि १०/१२/२०२४ रोजी मयत इसम हा मौजे धगडवाडी ता. रोहा येथे पोलावर नवीन तार टाकण्याचे काम करीत असतांना त्याला विजेचा शॉक लागल्याने त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले... त्यांच्या मृत्याची नोंद कोलाड पोलिस ठाण्यात १६/२०२४ बी एन एस एस १९४ प्रमाणे करण्यात आली आहे...
याचा पंचनामा पोसई खतीब रोहा पोलीस ठाणे यांनी केला असुन अधिक तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार एन ए शिर्के, अंमलदार सी. जी कुथे करीत आहेत...
