रोहा- घोसाळे (भाग्येश घोसाळकर ):-- आधुनिक तंत्रज्ञानाचा युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली आहे....त्यामुळे सर्व सामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही...अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात...यासाठी सर्वसामान्य रुग्णाची तपासणी करणे गरजेचे आहे...त्यामुळे आजरापणाचे निदान होऊन डॉक्टरांना उपचार करणे सोपे होते...
सकारात्मक दृष्टीकोनातून सामाजिक बांधिलकी जोपसविण्याचे काम परिवर्तन सामाजिक संस्था रोहा रायगड व लायन्स फाउंडेशन अलिबाग यांच्या सहकार्यातून मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर याचे आयोजन केले....या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला....आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले असल्याचे प्रतिपादन परिवर्तन सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी दिले...
या प्रसंगी डॉ. हर्षल गोरे,सर्वेश भगत,डॉ.राजपूत, डॉ.कोमल पवार, डॉ.गणेश जाधव,डॉक्टर अमोल चव्हाण यांची उपस्थिती व मार्गदर्शनाखाली शिबीर पार पडले...
