सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :-पोलीस स्टेशन रामटेक येथुन अवघ्या दोन अडीच किमी अंतरावर असलेल्या मौदा रोड शितलवाडी परिसरात असलेल्या महाकाल डेअरी अँन्ड बेकरीचे दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत बेकरीमध्ये प्रवेश करत ७ हजार रुपयांच्या मुद्देमालावर हातसाफ करुन चोरून नेल्याचा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला आहे... याबाबत पंकज बालपांडे (वय ४४, रा. चारगावं रोड शितलवाडी ) यांनी गुरुवार (दि. १९) पोलिसांत फिर्याद दिली आहे...
माहितीनुसार फिर्यादी पंकज सुर्यभान बालपांडे वय ४४ वर्ष रा. शितलवाडी हे नेहमी प्रमाणे त्यांची महाकाल डेअरी अँन्ड बेकरी दुकान बंद करुन घरी निघुन गेले... दुसऱ्या दिवशी दि. १९ डिसेंबरला सकाळी ८ वा नेहमीप्रमाणे बालपांडे हे त्यांच्या दुकानात गेले असता फिर्यादीला त्याच्या दुकानाचे शटर तुटलेल्या अवस्थेत दिसले. ..त्यामुळे त्यांनी दुकानाच्या आत मध्ये जावुन पाहणी केली असता त्यांच्या दुकानाच्या गल्ल्यातुन ३५००/- रुपये रोकड व ३५००/- रु. चे सिगरेट पँकेट असे एकुण ७०००/- रु. चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोराने रात्री दरम्यान चोरी केली... फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस ठाणे रामटेक येथे अपराध क्र. ९८७/ २०२४ कलम ३०५(अ) , ३३१(४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा करुन तपासात घेतला... घटनास्थळावरुन मिळालेल्या सि.सि.टि.व्हि. फुटेजच्या आधारे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आसाराम शेटे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रगटीकरण पथक करीत आहे...
