वारणानगर प्रतिनिधी ( किशोर जासुद ): कोल्हापूर जिल्ह्याचे नेते व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शाहूवाडी - पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार डॉ.विनय कोरे यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले...
यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव पाटील (पेरिडकर),श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील, वडगांव शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते...
