सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच क्रीडा स्पर्धेचा विध्यार्थ्यानी लुटला मनमुराद आनंद
माणगाव :- (नरेश पाटील)
माणगाव नगरपंचायत हद्दीतील राजिप खांदाड शाळेत गुरुवार दि. २८ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजित उतेखोल केंद्रस्तरीय क्रीडा व व्यक्तिमत्व विकास स्पर्धा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला... विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच क्रीडा स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला... विजेत्या विद्यार्थ्यांसह सहभागी विध्यार्थ्यांना चारिझेन फाउंडेशनतर्फे बक्षिसे देऊन गौरविण्यात आले...
या कार्यक्रमाचा उदघाटन गुरुवारी सकाळी राजिपचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार व माणगाव पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सुरेखा तांबट यांच्या हस्ते करण्यात आले... ज्ञानदेव पवार व सुरेखा तांबट यांचे केंद्र प्रमुख शंकर शिंदे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले...
या कार्यक्रमास माजी ग्रामपंचायत सदस्य काशीराम पवार,पोलीस पाटील नथुराम पवार,संतोष मांजरे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश पवार,केंद्र प्रमुख शंकर शिंदे,जेष्ठ ग्रामस्थ दत्ताराम पवार,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन मांजरे,मुख्याध्यपक श्रीम.पवार,श्रीम.पिंगळे,शिक्षिका सौं. नंदिनी वाले, अंबुर्ले, शिक्षक गायकवाड, कमिटी सदस्य शिक्षिका विनया जाधव, शिक्षिका मोरे, शिक्षिका गोसावी, शिक्षक खडतर, शिक्षिका येलवे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालकवर्ग,आदी मान्यवरांसह खांदाड ग्रामस्थ उपस्थित होते...
या स्पर्धेत सांस्कृतिक पारंपरिक नृत्य स्पर्धा प्रथम क्र.राजिप शाळा नाणोरे, द्वितीय क्र.राजिप पीएमश्री शाळा उतेखोलवाडी, तृतीय क्र.खांदाड शाळा. समूहगीत गायन स्पर्धा प्रथम क्र.राजिप शाळा खांदाड, द्वितीय क्र.विभागून राजिप पीएमश्री शाळा उतेखोलवाडी व विकास कॉलनी शाळा यांना देण्यात आला...
तृतीय क्र.बामणोली व खर्डी बुद्रुक शाळा. पथनाट्य स्पर्धा राजिप पीएमश्री शाळाउतेखोलवाडी, द्वितीय क्र.राजिप शाळा नाणोरे. मातीचे शिल्प स्पर्धा प्रथम क्र. शाळा जुने माणगाव, द्वितीय क्र.विकास कॉलनी शाळा, तृतीय क्र.पीएमश्री शाळा उतेखोलवाडी... दोरी उड्या स्पर्धा प्रथम क्र.शाळा गिरिजनवाडी, द्वितीय क्र. शाळा कळमजे, तृतीय क्र.चव्हाणवाडी शाळा. बेचकी नेम धरणे स्पर्धा प्रथम क्र.शाळा खर्डी बुद्रुक आदि.वाडी, द्वितीय क्र.चव्हाणवाडी शाळा, तृतीय क्र.शाळा कळमजे. लहान गट व मोठा गट प्रथम क्र.उतेखोल शाळा, द्वितीय क्र. खर्डी बुद्रुक शाळा. लगोरी स्पर्धा प्रथम क्र.विकास कॉलनी शाळा, द्वितीय क्र.उतेखोल आदिवासीवाडी शाळा... लंगडी स्पर्धा प्रथम क्र.पीएमश्री शाळा उतेखोलवाडी, द्वितीय क्र.शाळा गिरिजनवाडी, तृतीय क्र.शाळा उतेखोल. या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना राजिपचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती ज्ञानदेव पवार, चारिझेन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन मन रंधावा, उपाध्यक्ष सतीश काळे, मार्केटिंग हेड राकेश पडवळ, सदस्य किशोर झेमसे, केंद्र प्रमुख शंकर शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले...
सदर कार्यक्रमास ज्ञानदेव पवार, चारिझेन फाउंडेश, संतोष मांजरे, खांदाड शाळा, केंद्र प्रमुख शंकर शिंदे, शिक्षिका विनया जाधव, सुधा मोरे, दिनेश खडतर, पूर्वा येलवे, रितिका गोसावी, रमेश उभारे, सर्व शिक्षक वर्ग, खांदाड ग्रामस्थ यांनी विशेष सहकार्य करून हा कार्यक्रम केंद्र प्रमुख शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला...


