कायदा धाब्यावर बसवण्याचा गाढवपणा थांबवा;
आणि लोकाभिमुख आदर्श प्रक्रिया राबवा..
भिवंडी तालुका (विशेष प्रतिनिधी): धरणे आंदोलन दिनांक १३/१२/२०२४ रोजी ठाणे जिल्हापरिषद कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे..भिवंडी तालुक्यातील दाबाड.ग्रामपंचायत ही शासन निर्णयाविरुद्ध काम करत असून या पंचायतीचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू आहे..तसेच संबंधित सरपंच, उपसरपंच, सदस्य कमिटी बरखास्त करून ग्राम विकास अधिकारी यांच्यावर बनवायचे कारवाई करण्यात यावी या संदर्भात माननीय संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण श्री शंकर वडवले ठाणे शहराध्यक्ष दयानंद उल्मिक, ठाणे अध्यक्षा रूपाली जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत गुरुवारी १३ डिसेंबर रोजी ठाणे जिल्हा परिषद कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येत आहे..
श्री अशोक पडवळ ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष, श्री संतोष घुडे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष,श्री संतोष मस्के ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख, श्री शांताराम पाटील भिवंडी तालुका अध्यक्ष तसेच सर्व तालुका अध्यक्ष यांच्या उपस्थिती हे आंदोलन करण्यात येत आहे
