महाराष्ट्र वेदभुमी

स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड सन २०२५ च्या दिनदर्शिकाचे प्रकाशन


कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांच्या सन २०२५ च्या दिनदर्शिकाचे प्रकाशन मंगळवार दि.१७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता जेष्ठ नागरिक सभागृह कोलाड येथे रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा प्रितमताई पाटील तसेच ऐनवहाळ ग्रामपंचायत सरपंच विश्वनाथ धामणसे यांच्या हस्ते तसेच प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले...

यावेळी स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष गोरखनाथ कुर्ले, संचालक प्रविण भाई गांधी, सौ.प्रणिता गांधी, दगडू बामुगडे, पांडुरंग सानप, केशव महाबळे, बळीराम ठोंबरे,मारुती वाळंज, देवीदास सानप,हरिचंद्र जाधव, नथुराम शिंदे, अनंत पवार, प्रदिप एकबोटे, हिरामण सानप व हरिचंद्र चेरफले यांच्या सहित  जेष्ठ श्रेष्ठ नागरिक व माता भगिनी उपस्थित होत्या...     

कार्यक्रमाची सुरवात श्री.गणेशाचे व नविन दिनदर्शिकेचं पूजन करून नारळ अर्पण करण्यात आली...यानंतर प्रमुख मान्यरांचा अध्यक्षांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला...कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण  गांधी यांनी केले...यावेळी रोहा तालुका महिला अध्यक्षा प्रितम पाटील यांनी जेष्ठ नागरिक यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की जेष्ठ नागरिक संघटने बरोबर सुरुवाती पासूनचे ॠणानुबंध असल्याने आमची नेहमीच सहकार्याची भूमिका आहे व याहीपुढे असेल...शिवाय आज आलेला लाईट बिल व जेष्ठ नागरिक तिर्थ दर्शन सहल या दोन्ही विषयावर सहकार्य करण्यासाठी मी प्रयत्नशील असेन तसेच संघटनेचे अध्यक्ष गोरखनाथ कुर्ले यांनी आपले मनोगत व्यक्त केले...कार्यक्रमाच्या शेवटी बामुगडे यांनी सर्वच उपस्थितांचे आभार मानुन अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली...

Post a Comment

Previous Post Next Post